esakal | ब्रेक द चेन : किराणा दुकानाची वेळ कमी झाल्याने खरेदीसाठी गर्दी

बोलून बातमी शोधा

हिंगोली गर्दी

ब्रेक द चेन : किराणा दुकानाची वेळ कमी झाल्याने खरेदीसाठी गर्दी

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी बाजारपेठेत होणारी नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी दिवसभर सुरु असलेले किराणा दुकान, भाजी मंडीची वेळ कमी करण्यात आली असल्याने बुधवारी (ता. २१) शहरातील किराणा दुकानात खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या.

कोरोनाची साखळी तोडण्याचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बाजारात गर्दी होणार नाही यासाठी अत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने वगळता इतर दुकाने तीस एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. किराणा, दुध डेअरी, भाजीपाला विक्रीची दुकाने सुरु आहेत. शहरात मुख्य भाजी मंडीत गर्दी होणार नाही यासाठी नगरपालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार शहरात सहा ठिकाणी भाजीपाला विक्रीची दुकाने सुरु केली आहेत.

हेही वाचा - कळमनुरीत रॅपिड अँटीजन तपासणी न करता व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

या दुकानदाराना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक केले आहे. मात्र किराणा, भाजीपाला खरेदीच्या नावावर बाजारपेठेत होणारी गर्दी कायम दिसत असल्याने कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही. यासाठी आता बाजारात होणारी गर्दी कमी करण्यासाठी किराणा, दुध डेअरी भाजीपाला विक्रिवर निर्बंध लावण्यात आले आहेत. नवीन नियमाप्रमाणे ही दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळात सुरु राहणार असल्याने त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

बुधवारी शहरातील विविध किराणा दुकानासमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच शहरात ठिकठिकाणी असलेल्या भाजी मंडीत देखील गर्दी झाली होती. येथे पोलिस देखील तैनात करण्यात आले होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे