Broad Daylight Theft From Moving Truck on Solapur-Dhule Highway
sakal
येरमाळा - सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर तेरखेडा गावाजवळ सोमवारी (ता. ८) सकाळी सात वाजता चालत्या ट्रकमधुन चोरीची घटना घडली. चालत्या ट्रकमधून चोरट्यांनी माल लंपास करण्याचा प्रयत्न केला असता मागील तरी ट्रक चालकाच्या सतर्कतेमुळे मोठया चोरीचा प्रकार टळला असला तरी चालत्या ट्रकमधून चोरी करणाऱ्या चोरट्याचा प्रकार मोबाईलमध्ये शूटिंग केल्याचा व्हिडिओ सकाळ पासूनच व्हायरल झाल्याने पोलिस व्हायरलं व्हिडिओवरुन महामार्गवरील चोरांच्या मुसक्या आवळनार का? असा सवाल जिल्हा पोलिस प्रशासनाला तेरखेडा ग्रामस्थांतून केला जात आहे.