रक्षाबंधनच्या दिवशीच बहिण-भावाला मोटारीची धडक; 06 वर्षाच्या भावाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

धुळे-सोलापुर महामार्गावरील झाल्टा (ता. जि. औरंगाबाद) येथे शाळेत जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या सख्या बहीण, भावाला भरधाव कारने जोराची धडक दिली. त्यात संभाजी ज्ञानेश्वर शिंदे (वय 6 वर्षे, रा. झाल्टा) याचा मृत्यू झाला. तर त्याची बहीण श्रावणी ज्ञानेश्वर शिंदे (वय 11 वर्ष) ही गंभीर जखमी झाली.

चित्तेपिपंळगाव (जि. औरंगाबाद) : धुळे-सोलापुर महामार्गावरील झाल्टा (ता. जि. औरंगाबाद) येथे शाळेत जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या सख्या बहीण, भावाला भरधाव कारने जोराची धडक दिली. त्यात संभाजी ज्ञानेश्वर शिंदे (वय 6 वर्षे, रा. झाल्टा) याचा मृत्यू झाला. तर त्याची बहीण श्रावणी ज्ञानेश्वर शिंदे (वय 11 वर्ष) ही गंभीर जखमी झाली.

संभाजी हा दुसरीच्या वर्गात शिकत होता, आज 15 ऑगस्ट असल्याने संभाजी हा सुभाषचंद्र बोस यांचा वेष परिधान करून शाळेत निघाला होता, आजच्या बहीन भावाच्या नात्यात पवित्र मानला जाणारा सण रक्षाबंधन या दिवशीच बहीनीपासुन भाऊ दुरवल्याने, झाल्टा गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार संभाजी व त्याची मोठी बहीन श्रावणी हे दोघेही झाल्टा येथे रस्त्याच्या कडेला गुरूवारी  (ता. १५) सकाळी ६.३० वाजता ध्वजारोहणासाठी निपाणी येथील शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत उभे होते. केंब्रिज शाळेकडून येणार्‍या भरधाव कारने (क्रं. MH, 03 AW 6724) या दोघांना जोराची धडक दिली.

अपघात होताच येथील ग्रामस्थांनी दोघांनाही लगेच औरंगाबाद येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले असता तेथील डाॅक्टारांनी संभाजीला पुढील उपचाराठी घाटी रूग्णालयात पाठवले. घाटी रूग्णालयातील डाॅक्टारांनी संभाजी याला सकाळी साडे सात वाजता मृत्यू घोषीत केले. तर श्रावणी हिच्यावर औरंगाबाद येथे  खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brother dies in accident