esakal | माजलगाव : सख्या भावाने केला सख्या भावाचा खुन
sakal

बोलून बातमी शोधा

भावाचा खुन

माजलगाव : सख्ख्या भावाने केला सख्ख्या भावाचा खुन

sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव : आईच्या मानेवर विळा मारणा-या मुलाची आत्महत्या नसुन खुनच असल्याचे निष्पन्न झाले असुन सख्या भावाने सख्या भावाचा खुन केल्याची घटना तालुक्यातील मालीपारगाव येथे घडली असुन वडील मच्छिंद्र अंबादास कदम यांच्या फिर्यादीवरून लहान मुलगा गणेश कदम याने मोठा मुलगा बाबासाहेब कदम याचा खुन केला असल्याची फिर्याद ग्रामीण पोलिसात दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: मराठा आरक्षणासाठी शिवसंग्राम व क्रांती मोर्चाचे धरणे

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील माली पारगाव येथे बुधवारी ता. 1 दुपारी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शेतातच घर असणा-या पारूबाई कदम यांच्या मानेवर मुलगा बापू उर्फ बालासाहेब मच्छिंद्र कदम याने विळा मारून जखमी केले होते. यावेळी दुसरा मुलगा गणेश मच्छिंद्र कदम हाही तेथेच होता. आई पारूबाईला मारून गंभिर जखमी केल्यामुळे गणेशला राग अनावर झाला व त्याने बाबसाहेब कदम या सख्या भावाच्या मानेला जीव जाईपर्यंत त्याचा खुन केला. यानंतर आई पारूबाईल जखमी अवस्थेत बीडला उपचारासाठी हलविण्यात आले.

हेही वाचा: पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान ;पाहा व्हिडिओ

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन सखोल चौकशी केली असता बाबसाहेब कदम यांची आत्महत्या नसुन खुन झाल्याचा प्रकार उघड केला. याप्रकरणी वडील मच्छिंद्र अंबादास कदम यांच्या फिर्यादीवरून गणेश कदम विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश इधाते करत आहेत. सख्या भावाने सख्या भावाचा खुन केल्याने माली पारगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

loading image
go to top