esakal | मराठा आरक्षणासाठी शिवसंग्राम व क्रांती मोर्चाचे धरणे
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसंग्राम क्रांती मोर्चा

मराठा आरक्षणासाठी शिवसंग्राम व क्रांती मोर्चाचे धरणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी शिवसंग्राम आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता. दोन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध १७ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सरकारला देण्यात आले.

हेही वाचा: हिंगोली जिल्हा परिषद महाआवास अभियानामध्ये विभागात तृतीय

राज्यात मराठा समाजाने लाखोंच्या सहभागाचे मोर्चे काढले, अआदोलने केली, अनेकांनी बलिदान देऊनही समाजाच्या पदरी निराशाच पडली आहे. न्यायमुर्ती गायकवाड आयोग उच्च न्यायालयात टिकू शकतो, तोच आयोग सर्वोच्च न्यायालयात टिकू शकत नाही याबद्दल समाजात सरकारच्या धोरणाबद्दल शंका आहे. सर्वोच्च न्यायालयात समाजाची बाजू समर्थपणे मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. मंत्रिमंडळाच्या मराठा विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना समितीवरुन काढून टाकावे या प्रमुख मागणीचाही यामध्ये समावेश होता.

हेही वाचा: लातूरच्या एलसीबी पथकाचा उदगीरात छापा

नुकत्यात गठीत झालेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावरील सर्वच्या सर्व सदस्य हे मराठाविरोधी असल्याने सदर आयोग त्वरित बरखास्त करून नवीन समतोल सदस्यांना घेऊन आयोगाचे पुनःर्गठन करावे, सारथीला पाठबळ द्यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ५०० कोटी रुपयांचे अनुदान देत कर्ज देण्याचा अधिकार द्यावेत, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नावे जिल्हावार वसतीगृहांची उभारणी करावी, २०१४ च्या इएसबीसी व १८/१९च्या एसबीसी अंतर्गत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना त्वरित नियुक्त्या द्याव्यात, छत्रपती शिवरायांच्या मुंबई येथील स्मारकाला गती द्यावी, कोपर्डी (अ.नगर) व तांबडी (रायगड) येथील दुर्दैवी भगिनींना त्वरित न्याय द्यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. आंदोलनाला शिवसंग्राम, मराठा क्रांती मोर्चासह समविचारी पक्ष व सामाजिक संघटनांनीही पाठींबा दिला.

हेही वाचा: पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान ;पाहा व्हिडिओ

यावेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, सरचिटणीस अनिल घुमरे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक, कुंदा काळे, मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे समन्वयक बी. बी. जाधव, राजमुद्रा संघटनेचे किशोर पिंगळे, जिजाऊ प्रतिष्ठानचे देवीसिंह शिंदे, डॉ. गणेश ढवळे, सुहास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, दता गायकवाड, लक्ष्मण ढवळे, शेषेराव तांबे, मीरा डावकर, विनोद कवडे, नारायण काशीद, राजेंद्र आमटे, प्रशांत डोरले, मुकुंद गोरे, मनोज जाधव, नंदू पिंगळे, नितीन आगवान, राहुल गायकवाड, प्रकाश जाधव, गणेश मोरे, योगेश शेळके, नवनाथ काशीद, अनिकेत देशपांडे, सुरज बहिर, विजय सुपेकर, शकील खान, जाकीर हुसेन, शेख अजहर, लाला शेख, कुतूब शेख, शेख मुस्तफा आबेद शेख, सलमान अली, शेख नदीम, महादेव बहिर, पंडित शेंडगे महादेव बागलाने नितीन बुधनर, धर्मराज बसवले, हरिश्चंद्र ठोसर, कृष्णा परजणे, नामदेव धांडे, दत्ता इंगळे, शरद काजळे, बबन उबाळे, अश्विन शेळके, मंगला जगताप, कांताबाई लगड, नागोराव बोरगे, माऊली शिंदे, रामेश्वर पांडुळे, सुरेश बागलाने, बाबु सुरवसे आदींचा सहभाग होता.

loading image
go to top