
छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) बीएस्सी-पीएमटी (बॅचरल ऑफ पॅरामेडिकल टेक्निकल) या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या. ११ अभ्यासक्रमांच्या १२५ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया पार पडली. दोन्ही प्रवेश फेऱ्यांत ९३ प्रवेश निश्चित झाले.