ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील बीएसएफ जवानासह तीन ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

सिल्लोड - ट्रकने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील तीन जण ठार झाल्याची घटना अन्वी फाटा (ता. सिल्लोड) येथे सोमवारी (ता. 19) रात्री बाराच्या सुमारास घडली. मृतांत भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचा समावेश आहे. सागर धनवई (वय 22), रामचंद्र मोकासरे (वय 32, दोघे रा. उंडणगाव, ता. सिल्लोड) व नीलेश महाजन (वय 26, भगदरा, ता. जामनेर) अशी मृतांची नावे आहेत. रामचंद्र मोकासरे हे आसाम राज्यात बीएसएफमध्ये कार्यरत होते.

याबाबत माहिती अशी की सागर, रामचंद्र व नीलेश हे तिघे सिल्लोड येथून दुचाकीने (एमएच-20 डीएक्‍स-3537) उंडणगावकडे जात होते. रात्री बाराच्या सुमारास जळगावकडून सिल्लोडकडे येणाऱ्याने ट्रकने (एमएच-20 एए-7630) दुचाकीला समोरून धडक दिली. यात दुचाकीस्वार तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांना तपासून मृत घोषित केले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव मोहिते, परिवीक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रदीप मैराळे, उपनिरीक्षक सुरेश मान्टे, विलास सोनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली. उंडणगाव येथील दोघांवर मंगळवारी (ता. 20) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनातर्फे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

जवानाची 29 तारखेपर्यंत होती सुटी
सीमा सुरक्षा दलाचे जवान रामचंद्र मोकासरे हे महिन्याच्या सुटीवर आले होते. त्यांनी भावजी नीलेश महाजन यांच्या औरंगाबाद येथील घराशेजारी पत्नीस राहण्यासाठी भाड्याने खोली घेऊन साहित्य हलविले होते. 29 डिसेंबरला सुटी संपणार असल्यामुळे ते देशसेवा करण्यासाठी परतणार होते; परंतु अपघाती निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात रामचंद्र मोकासरे यांच्यासह त्यांच्या भावजींचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: bsf jawan death in accident