बजेटच्या प्रति भिरकावल्या ; तिघांचे नगरसेवकपद रद्द

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

महापालिका स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यास अडथळा आणून घोषणाबाजी करणाऱ्या तीन नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करण्यात आले. 

औरंगाबाद : महापालिका स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यास अडथळा आणून घोषणाबाजी करणाऱ्या तीन नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करण्यात आले. तीन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या निवृत्त आठ सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.  

यावेळी शहर विकास आघाडीचे गटनेते तथा मावळते सभापती गजानन बारवाल यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही अन्य सदस्यांची शिफारस करण्याऐवजी पुन्हा स्वतःच्याच नावाची शिफारस केली. यामुळे शहर विकास आघाडीतील सदस्यांनी रविवारी (ता.29 ) सभाग्रहात विशेष बैठकीमध्ये त्यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्याला विरोध केला. मावळत्या सभापतींनी विकास आघाडीतील सदस्यांचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा अंदाजपत्रक सादर करण्यास परवानगी देऊ नये, अशी त्यांनी मागणी केली होती.  

मात्र, महापौरांनी सभापती बारवालांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यास पाचारण केले. यावेळी आघाडीचे नगरसेवक कैलास गायकवाड,  गोकुळ मलके,  राहुल सोनवणे यांनी याला जोरदार विरोध करत घोषणाबाजी सुरू केली. महापौर पक्षपात करत असल्याचा आरोप करून बजेटच्या प्रति सभापती व महापौरांच्या अंगावर फेकल्या.

Web Title: Budget Copy Distributed Three Corporator Disqualified