बीड : बांधकाम अभियंते, व्यावसायिक, कामगार रस्त्यावर

कमलेश जाब्रस
मंगळवार, 27 मार्च 2018

बीड जिल्ह्यात माजलगांव तालुक्यात हिवरा भादली येथे संयुक्त वाळुचा ठेका आहे. परंतु हा ठेका बंद असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. बांधकामासाठी बारा महिणे वाळु उपलब्ध करून द्यावी तसेच मजुरांच्या हाताला काम द्यावे या मागण्यांसाठी तहसिल कार्यालयावर आज शनिवारी मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बांधकाम व्यावसायिक, मजुर, अभियंते आदी सहभागी झाले होते.

बीड (माजलगाव) : बांधकामासाठी बारा महिने वाळू उपलब्ध करून द्या, महाराष्ट् इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणी कार्यालय माजलगांव येथे उभारावे या मागणीसाठी बांधकाम अभियंते, व्यावसायिक, कामगार रस्त्यावर उतरले असुन तहसिल कार्यालयावर आज (मंगळवारी) मोंढ्यातुन तहसिल कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला. 

तालुक्यामध्ये वाळुचा ठेका बंद असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वच जण अडचणीत आले आहेत. बांधकाम साहित्य पुरवठा करणारे इलेक्ट्रीकल्स, प्लंबर्स, गवंडी, मजुर यांचेसह बांधकाम अभियंते यांच्या हाताला बांधकाम बंद असल्यामुळे कामच राहिले नाहीत. यामुळे सर्वांचीच कोंडी झाली आहे.

बीड जिल्ह्यात माजलगांव तालुक्यात हिवरा भादली येथे संयुक्त वाळुचा ठेका आहे. परंतु हा ठेका बंद असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. बांधकामासाठी बारा महिणे वाळु उपलब्ध करून द्यावी तसेच मजुरांच्या हाताला काम द्यावे या मागण्यांसाठी तहसिल कार्यालयावर आज शनिवारी मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बांधकाम व्यावसायिक, मजुर, अभियंते आदी सहभागी झाले होते.

Web Title: builders agitation in Beed

टॅग्स