भीषण अपघातात पाच ठार; 26 जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

येणेगूरजवळ दोन बसची समोरासमोर धडक
येणेगूर - भरधाव दोन बसची समोरासमोर धडक होऊन पाच जण जागीच ठार झाले, तर 26 जण जखमी झाले. त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर असून, पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील येणेगूरजवळ (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) आज सकाळी सव्वासातच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन्ही बसच्या चालकांचा समावेश आहे.

परिवहन महामंडळाची उमरगा-पुणे बस (एमएच 14 बीटी- 3254) पुण्याकडे निघाली होती, तर कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची तुळजापूर-आळंद बस (केए 28 एफ- 1603) आळंदकडे निघाली होती. भरधाव असलेल्या दोन्ही बसची आडवा पुलाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात दोन्ही बसचा चुराडा झाला. या भीषण अपघातात महामंडळाच्या बसचे चालक लक्ष्मण दत्तात्रेय म्हेत्रे (वय 34), कर्नाटक बसचे चालक आंबण्णा शिवरय्या तेलीकुणे (वय 32, रा. जिडगा, ता. आळंद) यांच्यासह उमरगा-पुणे बसमधील वामन मारुती साळुंके (वय 43, रा. उमरगा), शिवाजी मारुती साळुंखे (वय 40, रा. उमरगा) या सख्ख्या भावांसह राहुल रमाकांत कठारे (रा. तुळजापूर, हल्ली मुक्काम उस्मानाबाद) हे पाच जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच येणेगूर पोलिस दूरक्षेत्र व मुरूम पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, गंभीर जखमी झालेले डॉ. बसवराज होनाळे, नीलेश एवले, सुशील डोंगरे यांची परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सोलापूर येथील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

Web Title: bus accident in yenegur