उद्योजकांना हॉंगकॉंगची हाक

HongKong
HongKong

औरंगाबाद - हॉंगकॉंग ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिल (एचकेटीडीसी) व चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर (सीएमआयए), मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर (मसिआ) यांच्या वतीने शहरातील सूक्ष्म, मध्यम आणि मोठ्या उद्योजकांसाठी बुधवारी (ता. 23) विशेष कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये हॉंगकॉंगच्या माध्यमातून उद्योजकांसाठी जागतिक संधींची देवाण-घेवाण झाली. या कार्यशाळेत शंभराहून अधिक उद्योजकांनी सहभाग नोंदविला.

जगभरात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हॉंगकॉंग हे एक विकासाचे प्रवेशद्वार आहे. यासाठी स्थानिक उद्योजकांना तेथे आकर्षित करावे आणि त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांना वाव मिळावा, या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. औरंगाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या सूक्ष्म, मध्यम आणि मोठ्या उद्योजकांना असलेल्या संधींविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. मुख्यत्वेकरून इलेक्‍ट्रॉनिक्‍स आयसीडी, वैद्यकीय आणि औषध, होम, टेक्‍स्टाइल आणि वीजक्षेत्र यासाठी हा सेमिनार उपयोगी ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com