उद्योजकांनी पाहिला 'ऑरीक'चा पहिला टप्पा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

औरंगाबाद : दिल्ली मुंबई औद्योगिक क्षेत्रा अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी (ऑरीक) च्या पहिल्या टप्प्याची पाहणी शहरातील उद्योजकांनी केली. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या चमूने ही पाहणी केली. 

शहरातील उद्योजकांनी मंगळवारी (ता. 11) सायंकाळी औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी अर्थात ऑरीकच्या कामाची पाहणी केली. सीएमआयएच्या चमूने सध्या सुरू असलेली कामे, भविष्यातील गरज, रोजगार निर्मिती, ऑरीक हॉल आदी प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. यावेळी सहसरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी या उद्योजकांना सादरीकरणातून विविध विषयांची माहिती दिली. यावेळी सीएमआयए अध्यक्ष राम भोगले, सचिव कमलेश धूत, मुकुंद कुलकर्णी, प्रसाद कोकीळ, व्ही. एन. नांदपूरकर, गुरप्रितसिंग बग्गा आदींची उपस्थिती होती.

Web Title: Businessman visits Auric first level