esakal | हिंगोलीत चिमुकले बैठे खेळात व्यस्त
sakal

बोलून बातमी शोधा

house

सर्वत्र लॉकडाऊन असल्याने घरात राहणे सर्वांसाठीच गरजेचे झाले आहे. कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधासाठी संपर्क तोडणेच अत्यंत महत्वाचे आहे. लहान मुलांसह मोठे व्यक्‍तीदेखील घरात बसून विविध करमणुकीच्या साधनांचा उपयोग करत आहेत. 

हिंगोलीत चिमुकले बैठे खेळात व्यस्त

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी सर्वत्र लॉकडाऊन असल्याने मोठ्या व्यक्‍तींसह लहान चिमुकले देखील घरात अडकून पडले आहेत. बाहेर मैदानावर जाऊन खेळणेही जमत नसल्याने वेगवेगळ्या करमणुकीतून वेळ घालविण्याचे काम केले जात आहे. हिंगोलीतील संतनगर भागात दोन चिमुकल्या बहिण, भावाने आपल्या अभ्यासाच्या रजिस्टरचा उपयोग करून पाच मजली घर तयार केले आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वत्र लॉकडॉनमुळे लोकांना घराबाहेर पडणे जमत नाही. नेहमीच मोबाईलवर व मोबाईलच्या वेगवेगळ्या गेमवर करमणूक करणारे चिमुकले देखील कंटाळून गेले आहेत. परंतु, घरात राहणे सर्वांसाठीच गरजेचे झाले आहे. कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधासाठी संपर्क तोडणेच अत्यंत महत्वाचे आहे. लहान मुलांसह मोठे व्यक्‍तीदेखील घरात बसून विविध करमणुकीच्या साधनांचा उपयोग करत आहेत. 

हेही वाचा हिंगोलीत सुरक्षीत अंतरासाठी दुकांनांसमोर आखली वर्तुळे

पाच मजली घर बनविले

विद्यार्थ्यांना सुट्या लागल्याने ते देखील आता विविध कला आत्मसात करण्यात व्यस्त झाले आहेत. हिंगोली शहरातील संतनगर भागातील बालवाडीत शिकणारा शिवम सोळंके व सायली सोळंके या बहिण भावाने मोबाईलमध्ये रमण्यापेक्षा काहीतरी वेगळे करून दाखविण्याचा प्रयत्न केला. आपल्या दप्‍तरातून रजिस्टर व वह्या काढून त्याचा उपयोग करत पाच मजली घर बनविले. २५ लहानमोठ्या रजिस्टरचा उपयोग करून हे घर बनवून आपला एक दिवस निवांतपणे करमणूक करत घालविला. 

खेळातून करमणूक

शिवाय घर बनविण्याबरोबरच घरातच बसून त्यांनी वेगवेगळे खेळातून करमणूक केली जात आहे. मोठ्यांबरोबर बच्चे कंपनी घरात अडकून पडल्याने दिवसभर घरात राहून कंटाळा येत असल्याने वेगवेगळ्या बैठ्या खेळात आता मुले दंग झाली आहेत. यात कॅरम, बुद्धीबळ, सोंगट्या, सापसीडी यासह विविध बैठ्या खेळात मुलांना वेळ घालवाला लागत आहेत. काही मुले चित्रे काढण्यात दंग आहेत. मात्र शिवम व सायली या बहिण भावाने रजिस्‍टर एकत्र करून घर तयार केले आहे.


ठिकठिकाणी जंतनाशक फवारणी

हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने व नगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील विविध भागात स्‍वच्‍छतेची कामे हाती घेतली असून गल्‍लोगल्‍लीच्या नाल्याची साफसफाई करून कचऱ्याची विल्‍हेवाट लावली जात आहे. तसेच जंतनाशकाची फवारणी देखील केली जात आहे. शहरातील विविध प्रभागात नगरपालिका प्रशासनाने स्‍वच्‍छतेची कामे सुरू केली आहेत. पालिकेचे कर्मचारी सकाळ ते सायंकाळपर्यंत स्‍वच्‍छता करून जमा झालेल्या कचऱ्याची विल्‍हेवाट लावत आहेत. 

येथे क्लिक कराकोरोना : स्थलांतरीत चार हजार नागरिक पोचले गावी

विविध नगरात फवारणीला सुरुवात

तसेच शहरालगत असलेल्या बळसोंड ग्रामपंचायतंर्गत येणाऱ्या विविध नगरात फवारणीला सुरुवात झाली. बळसोंड ग्रामपंचायत, रामकृष्णानगर, पंढरपूरनगर, आनंदनगर, बळसोंड, शिक्षक कॉलनी, संत नामदेवनगर, ओमनगर, अंतुलेनगर, बायपास आदी भागात फवारणी करण्यात आली. या वेळी उपसरपंच किरण डहाळे, ग्रामसेवक राजेश किलचे, संतोष गोरे, रामभाऊ चवरे, राजू इंगळे, शेषराव शिखरे, सुनील शिखरे, गोपाल सारनायक यांच्यासह पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आदींची उपस्थिती होती.


 

loading image