esakal | हिंगोलीत सुरक्षीत अंतरासाठी दुकांनांसमोर आखली वर्तुळे
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli nagar palika

जीवनावश्यक वस्‍तुंच्या दुकानावर सुरक्षीत अंतरासाठी वतुळे तयार केली जात असून यात उभे राहून नागरिकांनी खरेदी करावी, दुकानारांनीही नियम पाळावेत असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. याउपक्रमामुळे दुकानांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. 

हिंगोलीत सुरक्षीत अंतरासाठी दुकांनांसमोर आखली वर्तुळे

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्‍ह्यात दिवसाआड बाजार सुरू आहे. सकाळी दहा ते दुपारी एक यावेळात अत्यावश्यक वस्‍तुंची दुकाने सुरू राहत असून नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. मात्र खरेदी करताना काही नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे बाजारात खरेदी करताना सुरक्षीत अंतर पाळून खरेदी करावी, यासाठी पालिका प्रशासनातर्फे सर्व दुकानांसमोर वतुळे आखण्यात आली आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. पोलिस प्रशासनातर्फे देखील शहरात ध्वनीक्षेपकावरून माहिती दिली जात आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील हे देखील गर्दी कमी करण्यासाठी नागरिकांना आवाहन करीत आहेत.

हेही वाचावाहतूक पोलिस कर्मचारी देणार ८१ दिवसांचे वेतन

सुरक्षीत अंतरासाठी वतुळे

बाजारात खरेदी करताना घ्यावयाची काळजी, या बाबत सूचना दिल्या जात आहेत. गर्दी करू नका, खरेदी करताना सुरक्षीत अंतर ठेवा, असे सांगितले जात आहे. तसेच जीवनावश्यक वस्‍तुंच्या दुकानावर सुरक्षीत अंतरासाठी वतुळे तयार केली जात असून यात उभे राहून नागरिकांनी खरेदी करावी, दुकानारांनीही नियम पाळावेत असे सांगितले जात आहे.

दुकानदारांनी रेषांची आखणी करावी

शहरातील सर्व व्यापारी, सार्वजनिक आस्थापनासमोर ग्राहकांमध्ये सुरक्षीत अंतर राहण्यासाठी नगरपालिकने सुरक्षीत अंतराची आखणी करून दिली आहे. काही दुकानासमोर आखणी राहिली असेल तर दुकानदारांनी स्वतः रेषांची आखणी करावी, मगच दुकान सुरू करावे.

-रामदास पाटील, मुख्याधिकारी, नगरपालिका


हिंगोलीत ८७ दात्यांनी केले रक्‍तदान 

हिंगोली : येथील योग विद्याधाम सामाजिक संस्‍थेतर्फे घेण्यात आलेल्या रक्‍तदान शिबिरात शुक्रवारी (ता.२७) ८७ दात्यांनी रक्‍तदान केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढीमधील रक्‍तसाठा कमी झाल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने येथील योग विद्याधाम सामाजिक संस्थेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.  राज्यासह जिल्‍ह्यात देखील संचारबंदी सुरू असताना चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात आहे. तरीही युवकांनी शिबिरात सहभाग घेत रक्‍तदान केले.

येथे क्लिक करा - ट्रकमधून तब्बल ३९६ मजुरांची वाहतूक

डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी भेट

विशेष म्हणजे संयोजकांतर्फे रक्तदात्याला घरून दुचाकीवरून आणले जात होते. रक्तदान झाल्यानंतर परत घरी नेऊनही सोडण्यात येत होते. रक्तदानस्थळी एक-एक मीटरवर खुर्च्या टाकून सोशल डिस्टन्स ठेवण्यात आला. या वेळी कोरोनाविषयी खबरदारी घेण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत सुरू असलेल्या शिबिरात ८७ जणांनी रक्तदान केले. शिबिरास जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. 
 

loading image
go to top