esakal | Marathwada : पालखी मार्गाच्या कंत्राटदाराला ४० कोटींचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी मार्गाच्या कंत्राटदाराला ४० कोटींचा दंड

कळंब : पालखी मार्गाच्या कंत्राटदाराला ४० कोटींचा दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळंब : माजलगाव-केज- कळंब-कूसळंब  या पालखी मार्गाचे कंत्राटदार मेघा इंजिनिअर अँड इन्फ्राट्रक्चर लि. हैदराबाद या कंपनीने विनापरवाना गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी कळंबचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.दांडाची रक्कम कमी करण्यासाठी कंपनीकडून महसूल विभागाकडे पायघड्या टाकण्यात आल्या,परंतु गौण खनिज बाबतीत 'नो सटेलमेंट'च्या भूमिकेत महसूल विभाग असल्याने दंड भरावाच लागणार असल्याची माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली आहे.

माजलगाव-केज-कळंब-कूसळंब या पालखी मार्गाचे ६० किलोमीटर अंतराचे सिमेंट रस्त्याचे या दोन पदरी कामाचे कंत्राट मेघा इंजिनिअर कन्ट्रक्शन कंपनीला रस्ते विकास महामंडळाकडून २०१७ ला देण्यात आले होते.शहरातील रस्ते रुंदीकरणाबाबत नागरिकाला अथवा पालिकेला याबाबत कुठलीच माहिती देण्यात आली नाही.या कंपनीवर राजकीय वरदहस्त असल्याने कुणालाच जुमान्यात आले नाही. या कंत्राटदाराने १ लाख १४५ ब्रास मुरूम दगड खोदकाम करण्यासाठी तालुक्यातील मस्सा (खंडेश्वरी) येथील सर्वेनंबर, ९१४, ९१६ ,९१७ ,९१९ या शिवारातून गौण खनिज उखनन करण्याची परवानगी घेतली होती. परंतु या कंपनीने मात्र १  लाख ७६ हजार ९०८ ब्रास गौण खनिज रस्त्याच्या कामासाठी वापरल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन सुबोध भावेचा चिमटा, म्हणाला...

कंपनीने मस्सा शिवारात वरील सर्वेनंबर मधून जास्तची तब्बल ७६ हजार ७६३ ब्रास गौण खनिज विनापरवानगी उत्खनन करून त्याची विल्हेवाट लावल्याचे ही उघड झाले आहे. कंत्राटदाराने गौण खनिज उत्खनन, वापर, वाहतूक व साठवणूक केल्याचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केलेल्याा चौकशीत आढळून आले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (1) व (८) प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेशित करण्यात आले होते. अवैधरित्या उत्खनन केलेल्या गौण खनिज च्या पाचपट दंडाची रक्कम तहसीलदार रोहन शिंदे यांनी निश्चित केली त्याप्रमाणे ४० कोटी रुपयाचा दंड या कंपनीला २० ऑगस्ट रोजी ठेवण्यात आला आहे. कंपनीने मात्र महसूलच्या आदेश धुडकावत आपला हेका दाखवत दंडाची रक्कम ३० दिवसाच्या आत भरलीच नाही. त्यानंतर कंपनीने पुन्हा हसेगाव, येरमाळा, मस्सा आदी भागात अनेक सर्वे नंबर मध्ये मोठमोठे खोदकाम करून अधिकचा म्हणजे ७० हजार ५९७.५४ ब्रास जास्तीचे उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले.

या कंपनीला तब्बल पाच पट् दंड म्हणजे ३७ कोटी ६ लाख ३७ हजार ८५ रुपये शासन खाती भरणा करावा व स्वामित्व धनाच्या अधिक दहा टक्के रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी म्हणून ३ कोटी ४२ लाख ३९ हजार ८०७ रुपये भरणा करावा असे, एकत्रित तब्बल ४० कोटी ४८ लाख ७६ हजार ८९२ रुपयांचा भरणा करण्याचे आदेश २० अगस्ट रोजी दिले आहे. याबाबत मेेेघा कंट्रक्शन कंपनी चे इंजिनीयर विकास विकी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल उचलला नाही.

loading image
go to top