सावधान! तूमचा मोबाईल ठरू शकतो कोरोना संसर्गाला पोषक

मोबाईलद्वारे सहज पोचू शकतात लहान मुलापर्यंत विषाणू
covid 19
covid 19covid 19

औरंगाबाद: गर्दीच्या ठिकाणी नाका-तोंडावर मास्क असतोच पण जेव्हा कॉल येतो; तेव्हा मोबाईलवर गर्दीत आपण बोलतो. त्यावेळी विषाणू मोबाईलवर बसू शकतात. हाताचा व चेहऱ्याचा संपर्क टाळला तरीही मोबाईलशी संपर्क असतोच. तोच मोबाईल सॅनेटाईज न करता मुलांच्या हाती पडल्यास लहान मुलांपर्यंत विषाणू सहज पोचू शकतात. त्यामुळे संसर्गाला पोषक (कॅरीयर) मोबाईल ठरू नये, यासाठी काळजी घ्यायला हवी.

कोविड संसर्गामुळे लहान मुलांचे भाव विश्‍व चार भितींतच कोंडले गेले. मैदानी खेळ व शाळांपासून ते दूरच आहेत. अशा मुलांसाठी चित्र काढण्याशिवाय मोबाईल हा एक आधार आहे. मुलांचा मोबाईलसाठी मोठा हट्ट असतो. हट्टापायी त्यांना मोबाईल द्यावा लागतो अशी स्थिती अनेकजण अनूभवतात. लहान मुलांसाठी मोबाईल सॅनेटाईज केलेला नसेल तर तो त्यांच्यासाठी बाधक ठरू शकतो. मोबाईलशिवाय इतर वस्तूही सॅनेटाईज केल्यानंतरच त्यांच्या हाती सोपवाव्यात.

covid 19
कोरोनाने हिरावले मराठवाड्यातील दीड हजारावर बालकांच्या डोईवरचे छत्र

एमआयएस-सी म्हणजे काय?
बालरोगतज्ज्ञ डॉ. रवी सावरे यांनी सांगितले, की एमआयएस-सी म्हणजे ‘मल्टी सिस्टीम इन्फ्लमेट्ररी सिम्डोम इन चिल्ड्रन. हा मुख्यत्वे कोरोना होऊन गेल्यानंतर तीन आठवडे ते ३ महिन्यापर्यंत होऊ शकतो. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती व कोविड अँटीबॉडी यांच्यात झालेली युद्धाची ही लक्षणे आहेत. मोठ्या व्यक्तींसारखा कोरोनामुळे लहान मुलांत सहसा न्यूमोनिया किंवा श्वसनास त्रास होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. गुंतागुंतीचे आजार असलेल्या मुलांना एमआयएस-सीचा हा धोका अधिक आहे. उदा. बालदमा, मधुमेह, रक्तविकार, हृदय विकार, किडनी-यकृत आजार, कुपोषित मुले, लठ्ठपणा, इतर काही कारणांमुळे रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर लवकर तपासणी केल्याने लवकर उपचार सुरू होऊन रुग्ण लवकर बरा होतो.

मूल चिडचिड करीत असेल तर...
लहान मुलांत कोविड दोन प्रकारे दिसू शकतो. ९५ टक्के कोरोनाबाधीत लहान मुलांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे असतात. परंतू बोलू न शकणारी छोटी बालके सतत चिडचिड करीत असतील, न थांबता रडत असतील, तर हे त्यांचे अंगदुखीचे लक्षण असू शकते. तोंडाची चव व वास जाणे ही लक्षणे लहान मुलांमध्ये सहसा आढळून येत नाहीत.

covid 19
Photo Story: भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांची 'झलक'

हीच वेळ तपासणीची

-लक्षणे दिसताच किंवा कोरोना रुग्णाच्या संपर्क आल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने त्वरीत कोविड तपासणी करा.
-अँटिजेनचा अहवाल अर्ध्यातासात समजतो. परंतू ५० टक्के रुग्णांत हा अहवाल निगेटिव्ह येऊ शकतो.
-अशा वेळी ‘आरटीपीसीआर’ तपासणी करावी. तिचा रिपोर्ट येईपर्यंत आई आणि मुलाला क्वारंटाईन करावे.
-अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह असल्यास आरटीपीसीआर करू नये.
-कारण अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह असल्यास आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह (३० टक्के) येण्याची शक्यता असते.

‘‘एमआयएस-सी हा आजार एका मुलाकडून दुसऱ्या मुलांकजे पसरत नाही. परंतू यावर तातडीने उपचार होणे गरजेचे आहे. नवी लक्षणे ‘कावासाकी डिसीज’ आणि ‘टॉक्सिक शॉक सिंड्रोम’ या रोगांशी मिळती जुळती आहेत. या लक्षणांवर लक्ष ठेऊन डॉक्टरांचा लवकर सल्ला घ्या, आजार अंगावर काढू नका.’’
-डॉ. रवी सावरे, बालरोगतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com