औरंगाबाद: कर्करोग रुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

योगेश पायघन
सोमवार, 28 मे 2018

पुन्हा असे होणार नाही याची दक्षता कंत्राटदाराने घ्यावी
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ठेकेदारावर आहे. रुग्णसेवा खंडित होणार नाही याची खबरदारी ठेकेदाराने घ्यावी. यापुढे असे प्रकार घडल्यास कंत्राटदारावर कारवाई करू.ठेकेदाराला समजावून पाच तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कामगार कामावर परतले.
- डॉ अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, कर्करोग रुग्णालय, औरंगाबाद

औरंगाबाद : तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही म्हणून शासकीय कर्करोग रुग्णालयातील 50 कर्मचाऱ्यांनी सोमवार (ता 28) सकाळी आठ वाजता काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने तासभर काम खोळंबळे होते. रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी यांनी कंत्राटदार व कर्मचारी यांच्यात यशस्वी मध्यस्थी केल्याने कामगार कामावर परतले.

डिसेंबर महिन्यात तीन महिन्यांच्या तात्पुरत्या कंत्राट देऊन घाटीत काम करणाऱ्या विद्युत मंडळाला कर्करोग रुग्णालयात काम करण्याची संधी देण्यात आली.मात्र कंत्राटाचे पैसे न मिळाल्याने ठेकेदाराने कर्मचाऱ्याचे वेतन थांबवले आहे. 

पुन्हा असे होणार नाही याची दक्षता कंत्राटदाराने घ्यावी
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ठेकेदारावर आहे. रुग्णसेवा खंडित होणार नाही याची खबरदारी ठेकेदाराने घ्यावी. यापुढे असे प्रकार घडल्यास कंत्राटदारावर कारवाई करू.ठेकेदाराला समजावून पाच तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कामगार कामावर परतले.
- डॉ अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, कर्करोग रुग्णालय, औरंगाबाद

लवकरच वेतन देऊ
घाटीचे दोन महिन्याचे वेतनाची रक्कम मिळालेली नाही. तर कर्करोग रुग्णालयातील ती महिन्याचे वेतन मिळाले नाही ते पैसे लवकरच मिळतील. येत्या पाच तारखेपर्यंत वेतनाचा प्रश्न मार्गी लावू. 
- वैभव सालपे, विद्युत मंडळ सुशिक्षित बेरोजगार सहकारी सोसायटी, ठेकेदार संस्था

पाच हजारही येत नाही हातात
रुग्णालयात गेली चार वर्ष काम करतोय ठेकेदार बदलतात पण आज पर्यंत ना ईएसआय ना पीएफ चा नंबर मिळाला. कामगार आयुक्त कार्यालय फक्त चकरा मारायला लावते. शोषण तर सुरूच आहे. पाच हजारही हातात पडत नाही. त्यात तीन महिने पगार झाले नाही तर खायचं काय?
-एक कर्मचारी, शासकीय कर्करोग रुग्णालय, औरंगाबाद

Web Title: cancer hospital worker strike in Aurangabad