उमरगा येथे कोविड रुग्णालयाची क्षमता आता शंभर बेडची

Capacity of Covid Hospital at Umarga is Now one Hundred Beds
Capacity of Covid Hospital at Umarga is Now one Hundred Beds
Updated on

उमरगा (जि. उस्मानाबाद) : कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयातील पन्नास बेडच्या कोविड रुग्णालयाची क्षमता वाढवून शंभर बेडचे करण्यात आले आहे.

येथील शेंडगे रुग्णालयाला खासगी कोविड रुग्णालयाची मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनातील गोंधळामुळे काही पॉझिटिव्ह रुग्णांचा संपर्क होऊ शकला नसल्याने धोका निर्माण झाला आहे. प्रशासनावर वाढता ताण असला, तरी टोलवाटोलवी करण्याचे मार्ग निघू शकत नाही, त्यासाठी समन्वय महत्त्वाचा आहे. 

येथे गुरुवारी (ता. ३०) रात्री आलेल्या ४६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी जवळपास पंधरा जणांचा संपर्क होऊ शकला नसल्याने गोंधळ उडाला. आरोग्य विभागावर असलेला कामाचा ताण यामुळे या गोष्टी घडत असल्या तरी पॉझिटिव्ह रुग्णांना मोकळे कसे सोडता येईल हा प्रश्न आहे. काही जणांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना फोन केला, त्यांनी त्या रुग्णांना रुग्णालयात
पाठविले. संपर्क न झालेल्या रुग्णांची यादी प्राप्त झाली तर संबंधित रुग्णांना तातडीने बोलवता येईल असे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी सांगितले, तर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे यांनी चार दिवसांत रुग्णालयाबरोबरच बाहेरच्या ठिकाणी मोठ्या संख्येने घेतलेल्या स्वॅबमुळे कामाचा ताण वाढल्याचे सांगून रुग्णांशी संपर्क सुरू असल्याचे सांगितले तर 
वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे यांनी चार दिवसांत रुग्णालयाबरोबरच बाहेरच्या ठिकाणी मोठ्या संख्येने घेतलेल्या स्वॅबमुळे कामाचा ताण वाढल्याचे सांगून रुग्णांशी संपर्क सुरू असल्याचे सांगितले. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक    
 
 
संपूर्ण उपजिल्हा रुग्णालय कोविडसाठी 
रूग्णसंख्या वाढल्याने संपूर्ण उपजिल्हा रुग्णालय कोविड रुग्णांसाठी करण्यात आले असून, शनिवारपासुन (ता. एक) रुग्णांवर तेथे उपचार करण्यात येणार आहेत. शिवाय प्रशासनाने येथील साठ बेडची क्षमता असलेल्या शेंडगे रुग्णालयाला खासगी कोविड रुग्णालय म्हणून नुकतीच मान्यता दिली आहे. तेथे कोविड रुग्णांच्या उपचाराचा खर्च सरकारने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे करता येईल असेही डॉ. बडे यांनी सांगितले. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
 
अॅन्टीजेंन टेस्टसाठी किट्स उपलब्ध होईनात 
शहरात सर्वाधिक संसर्ग पसरल्याने नागरिकांची चिंता वाढल्याने प्रशासनाने घरोघरी अॅन्टीजेंन टेस्ट करण्याची मोहीम हाती घेणे गरजेचे झाले आहे. मात्र, आठ दिवसांपासून किट्स उपलब्ध होत नसल्याने आरोग्य विभागाचाही नाइलाज झाला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com