‘या’ अॅपची तरुणांना भुरळ

प्रमोद चौधरी
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

नांंदेड : गाण्याचा छंद नाही, अशी व्यक्ती सापडणे दुर्मीळच. अनेकदा एकट्याने प्रवास करताना, एकांतामध्ये प्रत्येक व्यक्तीला गुणगुणण्याची सवय असतेच. त्यांच्या गुणगुणण्याला आता टिकटाॅकच्या अॅप आधार मिळत आहे. टिकटॉकच्या या नाना प्रकारच्या ऍप्सच्या सहाय्याने अलीकडच्या काळात घरोघरी गायक बनत असल्याचे चित्र बघायला मिळत आहेत.

नांंदेड : गाण्याचा छंद नाही, अशी व्यक्ती सापडणे दुर्मीळच. अनेकदा एकट्याने प्रवास करताना, एकांतामध्ये प्रत्येक व्यक्तीला गुणगुणण्याची सवय असतेच. त्यांच्या गुणगुणण्याला आता टिकटाॅकच्या अॅप आधार मिळत आहे. टिकटॉकच्या या नाना प्रकारच्या ऍप्सच्या सहाय्याने अलीकडच्या काळात घरोघरी गायक बनत असल्याचे चित्र बघायला मिळत आहेत.

पूर्वीच्या काळात एखाद्याला गाण्याचा सराव करावयाचा असला तरी त्याला अनेकांची मदत घ्यावी लागत होती. त्यामध्ये तबला, हार्मोनिअम तसेच अन्य वादकाचाही समावेश होता. ही सगळी खर्चिक बाब असल्याने एखाद्याला आवड असूनही या क्षेत्राकडे वळणे अडचणीचे ठरायचे. यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये टिकटॉकच्या साहाय्याने गाणे म्हणण्याचे वेड आता तरुण-तरुणींमध्ये येऊ लागल्याचे दिसत आहे. यामध्ये अन्य वादकांची गरज नसल्याने त्याचा सोपस्कार हा टिकटॉक गाण्याच्या माध्यमातून होत आहे. मात्र त्यावेळी टिकटॉकसाठी असणारी यंत्रणाही तितकीच महागडी असल्याने यांचा वापर सर्वांनाच करता येत नव्हता. आर्थिक परिस्थिती नसतानाही गाण्याचा छंद जोपासणाऱ्यांसाठी अलिकडच्या काळामध्ये अच्छे दिवस आल्याचे बघायला मिळत आहे.

रॉकस्टार बनण्याची संधी

मोबाईल फोनमधील अॅप वापर करून गाणे गुणगुणने शक्‍य आता झाले आहे. त्यामुळे आता घराघरांमध्ये गायक तयार होत आहे. त्याच्या दिमतीला आता पुन्हा विविध प्रकारचे मोबाईल अॅप आले आहेत. यामुळे मोबाईलमध्ये स्टुडिओप्रमाणे रेकॉर्डिंगही होत आहे. पुन्हा पुन्हा स्वतः ऐकता येण्याची सुविधा यामध्ये करण्यात आली आहे. शिवाय स्त्री-पुरुष अशी सुविधाही यामध्ये असल्याने पुन्हा गाण्यासाठी पार्टनरही ऑनलाइनच उपलब्ध असल्याने एक प्रकारे ऑनलाइन स्टुडिओच उभारल्याचा आभास यामुळे मिळत आहे.
या सर्वांसाठी कोणत्याही प्रकारची पैशाची गरज लागत नसून मोबाईलवर मिळणारे ऍप्स हे पूर्णतः मोफत आहे. हेडफोन अथवा मोबाईलचा अवघ्या ३०० रुपयांपर्यंतचा माईक आपल्याला रॉकस्टार बनवू शकतो.

तरुण आकर्षक

आज प्रत्येकजणच अॅप फोन वापरत आहेत. यातील विविध अॅप हवी असणारी गाणी केवळ शोधायची असून त्यांचा वापर करून गाणी गात आपला छंद जपासता येणे सहज शक्‍य आणि सोपे झालेले आहेत. टिकटॉक अॅप तरुण-तरुणींना भूरळ घातली असल्याने आता घराघरांमध्ये गायक तयार होतानाचे चित्र आहे. यामध्ये तरुणच नाहीतर ज्यांना संगीताची व गायनाची आवड आहे अशा ज्येष्ठांनीही आघाडी घेतली आहे.
- दीपक पडुळे (युवक)
 
महिलाही आघाडीवर

महिलांचा आवाज हा मुळतः मधुर असल्याने त्यांनी गाण्याबाबत थोडासा प्रयत्न केला तर तो चांगला होऊ शकतो. अनेक महिलांना मात्र आपण गायचे कसे व ते वाटते कसे याचाच अंदाज नसल्याने समस्या येत होत्या. आता या नव्या कमी खर्चिक सिस्टीममुळे त्यांनाही आपल्या आवाजाची जादू पारखण्याची संधी मिळत असल्याने महिलांनी आघाडी घेतल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
- मंजुश्री कुलकर्णी (स्वरसाक्षी संगीत अकॅडमी)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Captivate the youth of 'this' app