मंगळसूत्र पळविले अन्‌ दगडाखाली लपविले! 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारणाऱ्या मातेसमान ज्येष्ठ महिलेला एका भामट्याने मदतीची थाप मारली अन्‌ अडीच ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पळाला. पळता पळता मंगळसूत्र दगडाखाली ठेवले पण यादरम्यान पाठलाग करणाऱ्यांनी त्याला गाठून पोलिसांच्या स्वाधीन केले. 

गुरुवारी (ता. 28) सकाळी अकरादरम्यान दिल्ली गेटजवळ घडलेला हा प्रकार. मुकुंदवाडीतील कस्तुराबाई ठमाजी सनान्से (वय 68, रा. अंबिकानगर) या श्रावणबाळ योजनेची पेन्शन मंजूर करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक दिवसांपासून  चकरा मारीत आहेत. गुरुवारीही त्या याच कामासाठी तहसील कार्यालयात गेल्या. तेथील अधिकाऱ्यांना भेटून त्या वालसावंगीला भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी जात होत्या. दिल्ली गेट येथे उभे राहून त्या रिक्षाचालकाकडे विचारपूस करीत असतानाच त्यांच्याजवळ महापालिकेचा कंत्राटी चालक सिद्धार्थ पगारे (वय 31, रा. महापालिका क्वॉर्टर, दिल्ली गेट) आला.

त्याने कुठे जायचे असे विचारून मीपण तिकडेच जातोय असे म्हणत लक्ष विचलित करून कस्तुराबाई यांचे मंगळसूत्र हिसकावले. यादरम्यान त्या खाली कोसळल्या व 
त्यांना बोटाला व मनगटाला इजा झाली. मंगळसूत्र हिसकावल्याचे समजताच कस्तुराबाई यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत पगारे नेहरू बाल उद्यानाकडे पळाला. यादरम्यान नागरिकांनी धाव घेत पगारेचा पाठलाग करून त्याला पकडले व बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. 
 

संशयित पोलिसांच्या ताब्यात 
लोक मागे लागल्याचे पाहून संशयित पगारेने एका दगडाखाली मंगळसूत्र लपविले. यानंतर नेहरू बाल उद्यानातून पळ काढताना पगारेला नागरिकांनी पकडले. याचवेळी तिथे पोलिस पोचल्याने त्यांनी पगारेला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेत कस्तुराबाईंच्या बोटाला व मनगटाला जबर दुखापत झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com