पेमेंट अॅप वापरताय, तर व्हा सावधान

File photo
File photo

नांदेड : ‘गुगल पे’ अथवा ‘फोन पे’चा वापर करून आर्थिक व्यवहार करत असला तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे. ‘फोन पे’चा वापर करता का? असा फोन करत नवीन नेव्हिगेशन बघा, असे सांगत आॅनलाईन फसवणूक केली जात आहे. असाच प्रकार सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात घडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  

सायबर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल पेमेंट ही सुविधा जेवढी सोयीची आहे; तितक्याच प्रमाणात ही सेवा धोक्याची देखील आहे. डिजीटल पेमेंटची सुविधा आल्याने नागरिकांना विशेषतः मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण-करणाऱ्यांना सोपे झाले आहे.  यामुळे बॅंक खात्यातून थेट पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा  होत असल्याने ग्राहकांच्या वेळेची बचत होत आहे. घरबसल्या सर्व व्यवहार केले जात आहेत. मात्र, या सुविधेत अलिकडे धोके मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ‘फोन पे’ चा वापर करणाऱ्या ग्राहकांना फटका बसत असल्याच्या घटना बघायला मिळत आहेत.  

अशी होते फसवणूक
मोबाईल स्पॅम लिंक टेक्स्ट मेसेजवर पाठवल्या जातात. अथवा फोन करून लिंक पाठवली जाते. यामध्ये वेगवेगळ्या आॅफर्स देवून ग्राहकांना आकर्षित केले जाते. येथेच ग्राहक फसतो आणि लिंकवर क्लिक केल्यानंतर एकदा अॅप डाऊनलोड होते. डिटेल्स दिल्यानंतर काही वेळात तुमच्या बॅंक खात्यातून पैसे काढले जातात.

अशी घ्या काळजी
तुमच्या बॅंक खात्याची, मोबाईल वॉलेटची माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका. वॉलेट अॅपमध्ये सिक्युरीटीचा पर्याय निवडा. आॅनलाईन खरेदी करताना लगेच पेमेंट करण्यास सांगण्यात येत असल्यास सतर्क व्हा. पैसे पाठवत असल्यास संबंधित व्यक्तीचा नंबर व खाते याची खात्री करून घ्या. ओरोपी पिन नंबर कुणालाही देऊ नका. असे घडल्यास तातडीने सायबर पोलिसांकडे रितसर तक्रार करावी.

कुठल्याही प्रकारचे उत्तर देऊ नका
ग्राहकांना सायबर गुन्हेगारांनी टार्गेट करत त्यांना ‘फोन पे’ वापरता का? अशी वाचरना करतात. साहजिकच वापर करत असल्याने त्यांना होकार दिला जातो. समोरील व्यक्तीने त्यांना नवीन नेव्हिगेशन आले आहेत ते उघडा असे सांगितले जाते. हे अॅप उघडताच एक सेकंदात मोबाईलवर मेसेज येऊन खात्यातून रक्कम काढल्याचे आपल्या लक्षात येते. त्यामुळे असे फोन आल्यास त्याला उत्तर देऊ नका. फोन कट करून टाकावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com