दाेन काेटी घाेटाळ्याप्रकरणी गाेदामप्रमुखाविरुध्द गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

पैठण  (जि.औरंगाबाद) : येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात दर्जाहीन कडधान्याचा साठा खोटी कागदपत्रे तयार करून साठवून राज्य शासनाच्या दोन कोटी 91 लाख 23 हजार 166 रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गोदामप्रमुखाविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा शुक्रवारी (ता. 27) दाखल करण्यात आला आहे. सीताराम शंकर गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

वखार महामंडळाची पैठण येथे नारळा व तालुक्‍यातील धनगाव, इसारवाडी, विहामांडवा या ठिकाणी गोदामे आहेत. या गोदामांचा प्रमुख म्हणून गायकवाड याच्याकडे ता. 30 जून 2029 पर्यंत कार्यभार होता. मे 2018 ते ऑगस्ट 2018 पर्यंत निकृष्ट करण्यात आला होता. या साठ्याची भारत सरकारच्या वतीने तूर, हरभरा, उडीद या कडधान्यांच्या साठ्याची तपासणी करून तो साठा शासनाने ठरवून दिलेल्या नियमांच्या आधारे साठवणूक करण्याची जबाबदारी त्याची होती. याबाबत वखार महामंडळाच्या वरिष्ठांनी तशा सूचनाही वेळोवेळी देऊन किमान आधारभूत दर देऊन दर्जाप्रमाणे साठा करावा, असेही स्पष्ट केले होते. परंतु या सर्व शासनाच्या नियमांचे उल्लंघन गोदामप्रमुख यांनी करून हा साठा केला होता. यानंतर पुणे येथील राज्य वखार महामंडळाने याप्रकरणी साठा तपासणीसाठी एक तपासणी पथक स्थापन करून तपासणी साठ्याच्या नमुन्यांचे पृथक्करण केले असता हा सर्व साठा दर्जाहीन असल्याची बाब स्पष्ट झाली. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे विभागीय उपमहाव्यवस्थापक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी गोदामप्रमुखाविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गोदामप्रमुखाला अटक करणार : देशमुख
दरम्यान, या गोदाम धान्य साठ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस तपास करीत असून संशयित आरोपीला अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Filed against Godown Keeper