esakal | तरुणीवर अत्याचारप्रकरणी  सैन्यदलातील जवानाविरुद्ध आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कसबे धावंडा येथील गौतम खिल्लारे हा भारतीय सैन्य दलात जवान म्हणून कार्यरत आहे

तरुणीवर अत्याचारप्रकरणी  सैन्यदलातील जवानाविरुद्ध आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल

sakal_logo
By
सय्यद अतिक

आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) :  कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाने एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात मंगळवारी ( ता. नऊ ) गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळापुर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या कसबे धावंडा येथील गौतम खिल्लारे हा भारतीय सैन्य दलात जवान म्हणून कार्यरत आहे. त्याने गावातील एका तरुणीसोबत सुत जुळवले. त्यानंतर त्याने तिच्यासोबत जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून ऑगस्ट २०१९ ते  ऑगस्ट २०२० या काळात लग्नाचे खोटे नाटक करीत नांदेड येथे भाड्याची रुम घेऊन ठेवले व तिच्यासोबत अत्याचार केला. 

हेही वाचा पाच हजाराची लाच घेणाऱ्या कृषी पर्यवेक्षकास अटक; धर्माबाद येथील घटना

तरुणीने त्याला लग्नाविषयी विचारताच तो त्याची टाळाटाळ करीत होता. तरुणीने परत त्याला कधी लग्न करणार याबाबत जाब विचारताच तिला मारहाण करुन परत अत्याचार केला व लग्नास नकार दिला. 

याबाबत पिडीत तरुणीने आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी जवान गौतम  खिल्लारे याच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अच्च्यूत  मूपडे करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image