शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याकडून लाच घेणारा रोखपाल जाळ्यात

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

येथील शासकिय आयुर्वेद महाविद्यालयात आंतरवासीयता (इंटर्नशीप) प्रशिक्षण सुरू आहे. तक्रारदार हे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे. या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी नाशिक आरोग्य विद्यापिठाकडे विनंती अर्ज करून नागपूर आयुर्वेद महाविद्यालयात प्रशिक्षण घेतो. परंतु त्याला विद्यावेतन हे नांदेड आयुर्वेद महाविद्यालयातून मिळते.

नांदेड : विद्यावेतन रजीस्टरवर सही असलेले रशीद तिकीट लावू देण्यासाठी 500 रुपयाची लाच स्विकारणाऱ्या रोखपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. 20) दुपारी रंगेहात पकडले. त्याच्याविरूद्ध वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

येथील शासकिय आयुर्वेद महाविद्यालयात आंतरवासीयता (इंटर्नशीप) प्रशिक्षण सुरू आहे. तक्रारदार हे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे. या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी नाशिक आरोग्य विद्यापिठाकडे विनंती अर्ज करून नागपूर आयुर्वेद महाविद्यालयात प्रशिक्षण घेतो. परंतु त्याला विद्यावेतन हे नांदेड आयुर्वेद महाविद्यालयातून मिळते. दरमहा सहा हजार रुपये घेण्यासाठी त्याने आपल्या मित्राकडे रशीद तिकीटवर स्वाक्षरी करून पाठवून दिले. हे तिकीट घेऊन तक्रारदार विद्यार्थी अधिष्ठाता यांच्या कार्यालयातील रोखपाल शेख गनी हुसेन (वय 56) रा. राहूलनगर, परभणी यांच्या दालनात गेला. परंतु तिकीट लावू देण्यासाठी पाचशे रुपयाची लाच मागितली. विद्यार्थ्यांची नेहमीच पिळवणूक करणाऱ्या या रोखपालाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 10 आॅगस्टला करण्यात आली.

या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. मागणी सिध्द झाल्याने सोमवारी या महाविद्यालय परिसरात सापळा लावला. आणि रोखपाल अलगद 500 रुपये घेतांना रंगेहात लाचेच्या जाळ्यात अडकला. यानंतर महाविद्यालयात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची प्रशासनावर पकड नसल्याचे सिध्द होते. पोलिस निरीक्षक अशोक गिते यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधिक्षक संजय लाटकर, पोलिस उपाधिक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक गिते, कपील शेळके यांच्यासह कर्मचारी मारोती केसगीर, गणेश तालकोकुलवार, अमरजीतसिंह चौधरी, सुरेश पांचाळ आणि नरेंद्र बोडखे यांनी परिश्रम घेतले. 
 

Web Title: Cashier in the Government Ayurvedic College who is taking bribes from the student gets trapped