कॅशलेस व्यवहारासाठी एसबीआयने घेतला पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

मोबाईल, इंटरनेट बॅंकिंगसह एसबीआय बड्डी ॲपनेही पुरवणार सेवा

बीड - हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर निर्माण झालेली चलन टंचाई दूर करण्यासाठी बॅंका आणि प्रशासनाकडून कॅशलेस व्यवहारासाठी पुढाकार घेतला जात आहे. पाटोद्यात स्टेट बॅंक ऑफ इंडियाने कॅशलेस व्यवहारासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी दिली.

चलन टंचाईवर मात करण्यासाठी बॅंकांनी कॅशलेस व्यवहारासाठी जागृती करावी आणि पर्याय उपलब्ध करुन द्यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिल्या होत्या. यासाठी प्रत्येक बॅंकांनी किमान पाच गावे कॅशलेस करावीत, असेही त्यांनी सांगितले. यानुसार स्टेट बॅंक ऑफ इंडियाने पाटोदा गावात यासाठी पुढाकार घेतला आहे. पाटोद्यात एसबीआयसह हैदराबाद स्टेट बॅंक व ग्रामीण बॅंकही आहे. पण, एसबीआय या ठिकाणी दहा ग्राहक सेवा केंद्र सुरु करुन जागोजागी स्वाईप मशिन उपलब्ध करुन देणार आहे. 

सध्या २५ ठिकाणी या मशिन असून आणखी ५७ ठिकाणी त्या उपलब्ध करुन दिल्या जातील. तर व्यावसायिकांना मोबाईल व इंटरनेट बॅंकिंग सेवा पुरवली जाणार आहे. तसेच एसबीआय बड्डी या मोबाईल ॲपव्दारे व्यवहार कसा करावा याबाबत ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे, असेही विजय चव्हाण यांनी सांगितले आहे. 

Web Title: cashless transaction SBI initiative