esakal | परभणी पोलिस अधिक्षक कार्यालयात सीसीटीव्ही वॉल; नवाब मलिक यांच्या हस्ते उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

परभणी पोलिस अधीक्षक कार्यालय

परभणी पोलिस अधिक्षक कार्यालयात सीसीटीव्ही वॉल; नवाब मलिक यांच्या हस्ते उद्घाटन

sakal_logo
By
​गणेश पांडे

परभणी ः शहरातील संशयास्पद हालचालीवर पाळत ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने सीसीटीव्ही वॉल बसविण्यात आला आहे. याद्वारे शहरात ४२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरावर पोलिसांचा लाईव्ह वॉच असणार आहे.

परभणी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम अबाधित रहावी. कोरोना काळातील नियमाचे नागरीकांकडून पालन व्हावे यासाठी या यंत्रणेचा मोठा उपयोग होणार आहे. भविष्यातही याद्वारे विविध कार्यक्रम, जयंत्या, सण, उत्सवावर देखील पोलिसांचे कायम नजर असणार आहे. या यंत्रणेत सीसीटीव्ही व्हिडिओ वॉल ही ५५ इंचीच्या १५ स्क्रीनद्वारे बनवलेली आहे. शहरातील ४२ सीसीटीव्ही कॅमेऱ्या द्वारे चलचित्रे अंत्यत स्पष्ट दिसतात. यामुळे कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास व गुन्हे प्रगटीकरणासाठी व शहरातील वाहतुक नियंत्रणासाठी याची मदत होणार आहे. यामुळे भविष्यात सीसीटीव्ही च्या माध्यमतून गुन्हेगारांच्या हालचालीची माहिती मिळणार आहे. जिल्ह्याचे पालक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ता. एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या प्रणालीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलिस अधिक्षक जयंत मीना, अप्पर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, सहायक पोलिस अधिक्षक अविनाशकुमार आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - रमजान विशेष : लैलतुल कदर पवित्र रात्रीची इबादतने रमजानच्या तिसऱ्या पर्वास प्रारंभ

पोलिस दलाला २० नव्या गाड्या

परभणी पोलिस दलात जिल्हा नियोजन समिती अतंर्गत डायल ११२ प्रकल्पाकरिता महिंद्रा कंपनीच्या २० नव्या गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १० गाड्या यापूर्वीच पोलिस दलात दाखल झाल्या होत्या. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नविन दाखल झालेल्या १० गाड्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. २० गाड्यापैकी १९ गाड्या या जिल्हयातील पोलिस ठाण्याला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्यातील कामे गतीने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

"सीसीटीव्ही वॉलच्या माध्यमातून परभणी शहरातील हालचालीवर लक्ष केंद्रीत करता येणार आहे. ही प्रणाली शहरातील कायदा व सुवव्यस्था सांभाळण्यासाठी मदतगार ठरेल. देशव्यापी आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अतंर्गत आपत्कालीन सेवा आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी डायल ११२ ही सेवा लवकरच पुरविण्यात येणार आहे."

- जयंत मीना, पोलिस अधिक्षक, परभणी

पॉईन्टर

- शहरात ४२ सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लाईव्ह चित्रिकरण

- सर्व कॅमेऱ्यांचे पोलिस अधिक्षक कार्यालयातून नियंत्रण

- कायदा व सुव्यवस्थेसाठी होणार मदत

- लवकरच शहरात डायल ११२ ही सेवा सुरु होणार

- पोलिस दलात २० नव्या कोऱ्या गाड्या दाखल

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image