डॉ. आंबेडकर जयंती घरीच साजरी करा- डॉ. विपीन आणि श्री. मगर

प्रल्हाद कांबळे
रविवार, 12 एप्रिल 2020

साथीच्या पार्श्वभूमीवर  भिमजयंती घरीच साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन व जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे

नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागरिकांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर घरीच साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन व जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे. 

ता. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. हा आनंदाचा दिवस आहे. परंतु देशात कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक त्रस्त आहेत. हा आजार संसर्गजन्य असून त्याची लागण होण्याची भीती असल्याने नागरिकांनी एकत्रित येऊन सामूहिकपणे हा दिवस साजरा न करता, घरीच राहून तो साजरा करावा.

हेही वाचाVideo : डॉ. मुलमुले यांचे विलगीकरणातील दिवस त्यांच्याच शब्दात

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदासुद्धा लागू

जिल्ह्यात कलम १४४ लागू असून, संचारबंदी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदासुद्धा लागू असून त्या कायद्याची देखील पायमल्ली होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. 
अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्याचा, बुद्ध विहारात एकत्रित जमण्याचा, अनेक तास अभ्यास करण्याचा संकल्प सोडला जातो. परंतु, सध्याची परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग होवून फैलाव होण्याच्या भीतीमुळे, खबरदारी म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

प्रशासनास सहकार्य करावे

कोरोना साथ रोग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात मोठा समुदाय आला तर संसर्ग पसरण्याची जास्त भीती आहे, अशा वेळी सर्वांनी घरीच राहून कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी करण्याची ही वेळ आहे त्यामुळे नागरिकांनी घरीच राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपन व पोलिस अधीक्षक श्री मगर यांनी केले आहे.

येथे क्लिक करा - ‘त्या’ चार जणांना होम कोरंटाईन

भीमजयंती घरातच साजरी करा- भन्ते पय्यांबोधी

कोरोनाच्या महाभयंकर संकट समयी लॉकडाऊनचे आपण पालन करूयात. त्यामुळे प्रशासनाला व देशातील सर्व नागरिक बांधवांना सहकार्य होईल. दरवर्षी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंदात संपन्न करतो. परंतु या वेळेस कोरोना व्हायरसचे संकट संपूर्ण जगावर निर्माण झाले आहे. त्यामुळे जगातील बलाढ्य देशसुद्धा हतबल झालेले आपण बघतो. म्हणून यावर्षीची भिमजयंती आपल्या घरातच साजरी करा असे आवाहन भन्ते पय्याबोधी थेरो यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून केले आहे. 

ध्वजारोहण करून लगेचच त्रिशरण पंचशील

यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिलला संपन्न होत असताना आपण आपल्या प्रत्येक नगरातील लोकांनी ता. १४ एप्रिलच्या दिवशी सकाळी ठीक नऊ वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून आपापल्या अंगणात आपल्या मुलाबाळांसह तसेच आपल्या नगरातील बुद्ध विहाराकडे हात जोडून उभे राहावे. आपल्याच नगरातील पाच उपासक किंवा बौद्धाचार्याने विहारावर पंचरंगी किंवा निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करावे व माईकमधून सर्वांना ध्वजारोहण करून लगेचच त्रिशरण पंचशील द्यावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate Dr. Ambedkar Jayanti at home - Dr. Vipin and Shri. magar nanded news.