चालकाला डुलकी लागली, सिमेंटचा ट्रेलर उलटला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

चंद्रपूर येथून औरंगाबादकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रेलर चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील ताबा सुटून ट्रेलर उलटला. यात चालक किरकोळ जखमी झाला. जालना महामार्गावरील लाडगाव उड्डाणपूल उतरताना मंगळवारी (ता. 17) सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. या अपघातामुळे वाहनातील सिमेंट गोण्या रस्त्यालगत पडल्या.

करमाड (जि.औरंगाबाद) : चंद्रपूर येथून औरंगाबादकडे सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रेलर चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील ताबा सुटून ट्रेलर उलटला. यात चालक किरकोळ जखमी झाला. जालना महामार्गावरील लाडगाव उड्डाणपूल उतरताना मंगळवारी (ता. 17) सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. या अपघातामुळे वाहनातील सिमेंट गोण्या रस्त्यालगत पडल्या.

धनंजय निर्मळ यादव (24, रा. उत्तर प्रदेश) हा चालक किरकोळ जखमी झाला. यात ट्रेलरचे मोठे नुकसान झाले. चंद्रपूर येथील एका कंपनीतून औरंगाबाद येथे सिमेंट घेऊन निघालेले ट्रेलर (एमएच-34, एबी-7735) लाडगाव येथील टोलनाक्‍यावर मंगळवारी (ता. 17) सकाळी उड्डाणपूल उतरत असताना चालक धनंजय यादव याला डुलकी लागली. त्यामुळे वळण रस्त्यावर त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रेलर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यावेळी समोर व पाठीमागे कोणतेही वाहन नव्हते, मोठी हानी टळली. अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनचालकांसह बघ्यांची गर्दी झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cement Trailer Capsized