दहा हजाराची लाच घेताना केंद्रप्रमुख अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

हिंगोली : घरकुल मंजूर करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कळमनुरी पंचायत समितीच्‍या शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख बालाजी गोरे यास आखाडा बाळापूर (ता.कळमनुरी) येथे लाच लुचपतच्‍या पथकाने शुक्रवारी (ता. 30) सकाळी रंगेहाथ पकडले.

कळमनुरी तालुक्‍यातील खरवड येथील एका व्यक्‍तीस घरकुल मंजूर करून देण्यासाठी केंद्रप्रमुख बालाजी गोरे याने दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. सदर रक्‍कम आज आखाडा बाळापूर येथे देण्याचे ठरले होते. त्‍यानंतर संबंधित व्यक्‍तीने थेट हिंगोलीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्‍यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक रविंद्र थोरात, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील, जमादार उमर शेख, सुभाष आढाव, अभिमन्यू कांदे, विजय उपरे, प्रमोद थोरात, अवि किर्तनकार, गजानन आगलावे, रुद्रा कबाडे, संतोष दुमाने, शेख जमीर यांच्‍या पथकाने सकाळीच आखाडा बाळापूर येथे सापळा रचला होता. 

दरम्‍यान, आज सकाळी आखाडा बाळापूर येथील एका हॉटेलमध्ये दहा हजाराची लाच घेताना केंद्रप्रमुख बालाजी गोरे यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Web Title: center head caught while accepting bribe