नांदेड : उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, बारा आरोपी अटक

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 26 जून 2018

नांदेड : उत्पादन शुल्कच्या विशेष पथकांनी जिल्ह्यात काही ठिकाणी अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई केली. यावेळी १२ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

नांदेड : उत्पादन शुल्कच्या विशेष पथकांनी जिल्ह्यात काही ठिकाणी अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई केली. यावेळी १२ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. २४ व २५ जून रोजी केलेल्या कारवाईत १७ गुन्हे दाखल केले. त्यात वारस १२ गुन्हे दाखल करून १२ आरोपींना अटक केली. पाच आरोपी मुद्दमेमाल सोडून पसार झाले. पथकांनी ५५ लीटर देशी दारु, १७५ लीटर हातभट्टी दारु, ९० लीटर ताडी आणि ७४० लीटर दारु बनविण्याचे रसायन जप्त केले. तसेच अवैधरित्या या दारूची वाहतुक करणाऱ्या तीन दुचाकी जप्त करून १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जवळपास दोन लाख दोन हजार २९० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. अचानक पडलेल्या या छापासत्रांमुळे अवैध धंदेवाल्यांची धाबे दणानले आहेत. यापुढेही अवैध दारु, देशी व हातभट्टी विक्री व साठेबाजावर कारवाई करण्यात येईल असे श्री. सांगडे यांनी सांगितले. 

 

Web Title: Central Board of Indirect taxes and Customs department action 12 arrested

टॅग्स