सीईओ शर्मा यांनी केली टोकाईगड येथील वृक्षसंवर्धनाची पाहणी

CEO Radhabinod Sharma has visited Sahyadri Devrai Tokaigad in Kurunda in Wasmat taluka and inspected the tree planting..jpg
CEO Radhabinod Sharma has visited Sahyadri Devrai Tokaigad in Kurunda in Wasmat taluka and inspected the tree planting..jpg

कुरुंदा (ता. वसमत जि.हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील सहयाद्री देवराई टोकाईगड येथे शनिवार (ता.०६) सीईओ राधाबिनोद शर्मा यांनी भेट देऊन वृक्ष लागवडीची पाहणी केली. वृक्षप्रेमी मंडळाचे कौतुक करत या उपक्रमासाठी शासनाच्या वतीने मदत करण्याचे आश्वासन दिले.

येथील सह्याद्री देवराई टोकाईगडावर सुरू असलेल्या वृक्ष संवर्धन कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी श्री.शर्मा व त्यांची टीम यांनी शनिवारी टोकाईगडावर अचानक भेट दिली व त्यांनी आपल्या निसर्गाबद्दल असलेल्या प्रेमापोटी सहयाद्री देवराई टोकाईगडाला पाहिजे ती मदत करण्याचं आश्वासन दिले. यासंबंधी विविध सुचनाही  केल्या, त्यांनी केलेल्या सूचनेचे पालन करून टोकाईगड जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे निसर्ग पर्यटन स्थळ बनविण्यासाठी त्यांच्या माध्यमातून अधिक प्रयत्न करण्यात येतील, असे वृक्षप्रेमीच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिलिंद पोहरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, मुख्यलेखा वित्त अधिकारी श्री. पाते, कार्यकारी अभियंता श्री. तांबे, श्री. पवार, उपविभागीय पाणीपुरवठा अभियंता श्री. रुमाले, विस्तार अधिकारी विष्णू भोजे, गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोसे, सहायक गटविकास अधिकारी बाबुलाल शिंदे, विस्तार अधिकारी गोरे आदी उपस्थित होते.

मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शर्मा यांची डिग्रस खुर्द खाजमापुरला भेट

गिरगाव : वसमत तालुक्यातील स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त डिग्रस खुर्द, खाजमापुर वाडी येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राधाबिनोद शर्मा यांनी शनिवारी (ता.०६) भेट देऊन येथे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची पाहणी केली.

डिग्रस खुर्द, खाजमापुर वाडी येथे ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियान स्वच्छतागृहे गावातील अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राधाबिनोद शर्मा यांनी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांना दिलेल्या सोविसुविधा यांची सुद्धा तपासणी त्यांनी केली. यावेळी सरपंच  शकुंतला मोकळे, उपसरपंच रामराव दळवी यांनी त्यांचा सत्कार केला. 

यावेळी गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोशे, सहायक गटविकास अधिकारी बी. टी. शिंदे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका चव्हाण, पर्यवेक्षक श्री. बाळगिडे ग्रामपंचायत सदस्य बाबाराव मुक्के, कैलास नरडेले, रमेश नरडेले, ग्रामसेविका एल. एम. जटाळे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा यांच्या सह गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com