esakal | हिंदूहदयसम्राट शब्द उच्चारत बाळासाहेबांबद्दल काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शिवसेने सोबत 35 वर्षे शहरात महापालिकेत सोबत होते. आता शिवसेना महाआघाडी सोबत गेल्यामूळे पाच महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणुका लढवेल.

हिंदूहदयसम्राट शब्द उच्चारत बाळासाहेबांबद्दल काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : गेली 30 ते 35 वर्षे भाजप शिवसेना-भाजपने औरंगाबाद महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हक्‍कासाठी भांडलो. शहराचा चांगल्या प्रकारे विकास केला. मात्र आता शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. यामूळे 'हिंदुह्दयसम्राट' बाळासाहेब ठाकरे आता 'वंदनीय' बाळासाहेब ठाकरे झाले आहेत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला.

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीच्या अनुषागाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीपुर्वी श्री.पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मराठा समाजाच्या हिताबद्दल काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पाटील म्हणाले, ''भारतीय जनता पक्षाने लोकांच्या विकासासाठी निवडणुका लढल्या आहेत. शिवसेनेसोबत 35 वर्षे शहरात महापालिकेत सोबत होते. आता शिवसेना महाआघाडी सोबत गेल्यामुळे पाच महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणुका लढवेल. सर्वसामान्यांना जे सरकार हवे आहे, ते सरकार आणण्यासाठी स्वाभाविकपणे लोकांचे सेवक होणे ही आमची जबाबदारी राहील.''

Video : हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या

''भारतीय जनता पक्षाच्या तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. महाराष्ट्र आणि हरियानात झालेल्या निवडणुकामूळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. राज्यात महिनाभर सत्तानाट्य चालले. सगळ्या निवडणुका रेंगाळल्या होत्या. त्याला गती देण्यासाठी महाराष्ट्राचे संघटनमंत्री विजय पुराणिक आणि मी दोघेही राज्यात विभागा निहाय संघटनात्मक आढावा घेत आहेत. या बैठकीत कार्यकारिणी, बुथ,मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ठरला का यांचा आढावा घेत आहोत. राज्यातील भाजपच्या सोयीने संघटनात्मकदृष्टया 70 जिल्हे करण्यात आले आहे. यात मराठवाड्यात 12 जिल्हे करण्यात आले आहे. त्यांच्या निवडणुका 30 डिसेंबरपुर्वी पुर्ण होणार आहे. यानंतर 1 ते 5 जानेवारी दरम्यान राज्याचा अध्यक्ष त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.'' असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.