esakal | मराठा समाजाच्या हिताचे निर्णय रद्द का करताय? : Video
sakal

बोलून बातमी शोधा

Bjp meeting in Aurangabad

''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते.''

मराठा समाजाच्या हिताचे निर्णय रद्द का करताय? : Video

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार काढून घेतले. थोडक्‍यात काय तर त्यांना काहीच करायचं नाही,'' अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. 

औरंगाबादमध्ये भारतीय जनता पक्षाची विभागीय आढावा सोमवारी (ता.9) जिल्हा कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह मराठवाड्यातील प्रदेश पातळीवरील नेते उपस्थित आहेत. बैठकीपूर्वी ' चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या निर्णयांबद्दल आपली प्रतिक्रिया "सकाळ' दिली. या बैठकीस माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, बाल हक्‍क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, माजी राज्यमंत्री अतुल सावे, प्रदेश प्रवक्‍ते शिरीष बोराळकर, आमदार सुजितसिंह ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

इथे होता - महिलांची विक्री करणारा नराधम

सारथीसारख्या स्वायत्त संस्थेवर मर्यादा आल्यामुळे मराठा आणि कुणबी समाजातून प्रतिक्रिया उमटतील. त्यामुळे सरकारला आवाहन आहे की, काय पंगा आहे, तो तुमचा आमचा राजकीय आहे. सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेऊ नका, असे आवाहनही पाटील यांनी ठाकरे सरकारला केले आहे. 

राज्यातील 25 गावातील रस्ते, हजार कोटींच्या पाण्याच्या योजना, सारथी म्हणजेच, मराठा-कुणबींना सुविधा असे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय रद्द करून तुम्हाला काय मिळणार आहे ? कुणावर सूड उगवताय?. हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या, आम्ही तयार आहोत, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला दिले. 

बायकोला चांगले वागवण्य़ाच्या अटीवर सुटले हे साहेब

जानेवारीत राष्ट्रीय अध्यक्षांची निवड 

मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र बैठक घेत, बुथ निहाय आढावा घेण्यात आला. यात 30 डिसेंबर पर्यंत विभागनिहाय संघटनात्मक निवड प्रक्रीया पुर्ण केली जाणार आहे. त्यानंतर 1ते 5 जानेवारी दरम्यान राज्याचा अध्यक्ष त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याचेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

मदती ऐवजी राजकारणाचाच घाट 

सारथी स्वयत्त संस्थामूळे मराठा-कुणबी समाजातील तरुणांना आर्थिक मदत होण्याऐवजी,या संस्थेच्या नावाने राजकारणाचा घाट घातल्याचे चित्र मागील आठवड्याभरापासून सातत्याने पहावयास मिळत आहे. मुख्यत्वेत करून या राजकीय स्वरुपामूळे संस्थेचा मुळ उद्देश गरजूपर्यंत पोहचत नाही. अशीही दुसरी राजकीय नेत्यांनी समजून घ्यायला हवी अशी भावना तरुण वर्गातून व्यक्‍त होत आहे. 
 

loading image