लोकसहभागातून बदलावा शाळेचा चेहरामोहरा : अनुराधा चव्हाण
फुलंब्री : शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा, याप्रमाणे वाहेगावकारांनी जास्तीत जास्त लोकसहभाग उभारून शाळेचा चेहरा मोहरा बदलावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील वाहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या रंगरंगोटीसाठी बैठक व वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होते.
फुलंब्री : शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा, याप्रमाणे वाहेगावकारांनी जास्तीत जास्त लोकसहभाग उभारून शाळेचा चेहरा मोहरा बदलावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील वाहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या रंगरंगोटीसाठी बैठक व वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होते.
यावेळी सरपंच मंगलाताई वाहेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाहेगाव येथील शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापक संतोष ताठे यांच्या संकलनेतून शालेय परिसर आंतर बाह्य रंगरंगोटीसाठी मोठ्या लोकसहभागाची आवश्यकता असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. लोकसहभागाची गरज आपण सर्व गाव मिळून जमा करून शाळेला चांगले रूप व दर्जेदार शिक्षण देऊन पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.
लोकसहभागातून शाळेचा चेहरा बदलल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या सेवा सुविधा असलेल्या शाळेत शिक्षण घेत असल्याची भावना आपण देऊ शकतो असे मत सरपंच मंगला वाहेगावकर यांनी प्रसंगी व्यक्त केले. तसेच यावेळी शाळेस भेट दिल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लास सुरू करण्यात आले आहेत. शालेय आंतर बाह्य रंगरगोटी करण्यासाठी शालेय निधी नसल्यामुळे, समाज सहभागातूनच हा शाळेचा विकास करावा लागेल असे मुख्याध्यापक संतोष ताठे सर्व वाहेगाव येथील ग्रामस्थ यांना समजून सांगितल्यामुळे सर्वांनी शाळेसाठी निधी जमा करण्याचा संकल्प केला.
यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष कारभारी श्रीखंडे, शालेय अध्यक्ष रुखमण श्रीखंडे, उपाध्यक्ष बाळू जाधव, ओंकार वाहेगावकर, उपसरपंच सखुबाई कमलाकर श्रीखंडे, धुपाजी श्रीखंडे, शिला येवलकर, सुरेश बोर्डे, प्रवीण श्रीखंडे, बिस्मिल्ला शेख, रंजना श्रीखंडे, संजय वाघ, कांताबाई बोर्डे, नमिता महामुने, कौशल्या गायकवाड, सुरेश श्रीखंडे, दौलत श्रीखंडे, भानुदास श्रीखंडे, रुखमण श्रीखंडे, लक्ष्मण श्रीखंडे, सर्जेराव श्रीखंडे, बाबुराव श्रीखंडे, दामोधार बोर्डे, रामराव बोर्डे, लता कौशिके, नंदा फरकाडे, उशाबाई श्रीखंडे, रवी पळसकर, निलेश श्रीखंडे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शाळेतील सर्व मुलांना ट्रॅक सूट व एक गणवेश असे दोन गणवेश मुख्याध्यापक संतोष ताठे यांनी स्वतः टाकून विद्यार्थ्यांना दिले. शाळेत मयूर पंख, स्पायकस, नारळ, सप्तपर्णी, अशोका, वॉटर पाम, ख्रिसमस ट्री, ड्रेसिया, आदीची 80 झाडे तसेच कुंड्यात 25 शोभिवंत झाडे लावण्यात येऊन शालेय परिसर रंगरंगोटी करण्यात आली असुन चांगले शालेय वातावरण तयार झाले आहेत. याकामी मनेश शेजुळ, रामदास गवरे, मेहनत घेतली आहे.