उदगीरच्या देवर्जनमधील मारहाण प्रकरणी 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरु

युवराज धोतरे
Wednesday, 20 January 2021

अधिक तपास पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे हे करीत आहेत.  

उदगीर (जि.लातूर) : देवर्जन (ता.उदगीर) येथे किरकोळ कारणावरून २९ डिसेंबर रोजी एकोणीस दिवसांपूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणी एका गटाच्या १९ जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा, तर दुसऱ्या गटातील नऊ जणांवर जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणीचे गुन्हे ग्रामीण पोलीसात दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की एकोणीस दिवसांपूर्वी भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादी जलील मोहम्मद शेख याच्या नातलगांना आरोपींनी लोखंडी रॉड , लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करीत जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

या प्रकरणी आरोपी योगेश कांबळे याने सोबत आरोपी आकाश अंगद कांबळे , प्रशांत कांबळे , लखन अंगद कांबळे , अजय कांबळे , अविनाश  कांबळे , सोमनाथ कांबळे , चंदू कांबळे , अमोल कांबळे , माणिक कांबळे , किरण जगताप , दत्ता जगताप , पांडुरंग कांबळे , सचिन कांबळे , रामेश्वर कांबळे , परमेश्वर कांबळे , अंगद कांबळे , अमोल कांबळे यांच्यावर मंगळवारी (ता.१९) जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे हे करीत आहेत.  

माझ्या ऑटो पुढे ऑटो का लावलास म्हणुन विचारपुस केली असता तुला गावात आल्यावर दाखवतो असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. गावात आल्यानंतर गावातील मारुती मंदिराच्या पाठीमागे बेकायदा मंडळी जमवून लोखंडी रॉड, कत्ती, काट्याने फिर्यादी योगेश चंद्रकांत कांबळे यास व त्याच्या चुलत भाऊ व इतर नातेवाईकांना बेदम मारहाण करून जखमी केले. जातीवाचक शिवीगाळ केली. जीवे मारण्याचा प्रयत्न करून धमकी दिली अशी फिर्याद ग्रामीण पोलिसात दिल्याने आरोपी असलम शेख, जलील शेख, तैमुर शेख, महमूद शेख, तजमूल शेख, फाजल शेख, फयूम शेख, अहम शेख व मस्तानबी शेख या नऊ जणांविरुद्ध येथील ग्रामीण पोलिसात जातीवाचक शिवीगाळ, मारहाण केल्या प्रकरणी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार मंगळवारी (ता.१९) रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव लातूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या परिस्थितीचा आढावा घेतला.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charges Filed Against Ninety And Atrocity On Nine People Udgir Latur Latest News