नोकरीच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

औरंगाबाद - अनुदानित आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखवून युवकास साडेपाच लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक नाथाजी रायभान-पाटील (रा. पुणे) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.संशयित दीपक पाटील याने महेश सुदाम दंडीमे (२८, रा. गाजूर, ता. लातूर, ह. मु. नंदनवन कॉलनी) या युवकास शिक्षकाची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्याच्याकडून १० जून २०१७ रोजी ५ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर पाटील याने दंडीमे याला अनुसूचित जमाती निवासी आश्रमशाळा, ढोरेगाव (ता. गंगापूर) या शाळेचे बनावट नियुक्तिपत्र दिले.

औरंगाबाद - अनुदानित आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखवून युवकास साडेपाच लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक नाथाजी रायभान-पाटील (रा. पुणे) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.संशयित दीपक पाटील याने महेश सुदाम दंडीमे (२८, रा. गाजूर, ता. लातूर, ह. मु. नंदनवन कॉलनी) या युवकास शिक्षकाची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्याच्याकडून १० जून २०१७ रोजी ५ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर पाटील याने दंडीमे याला अनुसूचित जमाती निवासी आश्रमशाळा, ढोरेगाव (ता. गंगापूर) या शाळेचे बनावट नियुक्तिपत्र दिले. ते बनावट असल्याचे लक्षात आल्यावर दंडीमे याने पैसे परत द्या, असा तगादा लावला असता आरोपी पाटील याने पैसे देण्यास नकार दिला. दंडीमे याने दिलेल्या तक्रारीवरून दीपक पाटील याच्याविरुद्ध छावणी पोलिसात गुन्हा दाखल झाला.

Web Title: cheating crime

टॅग्स