नोकरीच्या आमिषाने पाच लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

लातूर - नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लातूर जिल्ह्यातील एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजी भीमाजी शेलार (रा. नगर) असे संशयिताचे नाव आहे. हरिश्‍चंद्र मरेप्पा नामवाड (वय 64, रा. नांदेड नाका, उदगीर) यांच्या मुलाला नगरमधील अर्बन बॅंकेत क्‍लार्क म्हणून नोकरी लावतो, असे सांगून शेलारने पाच लाख रुपये घेतले; पण नोकरी लावली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे नामवाड यांच्या लक्षात आले. त्यांनी उदगीर शहर पोलिस ठाण्यात शेलारविरुद्ध तक्रार दाखल केली.
Web Title: cheating crime