एक तपानंतर लागला तो पोलिसांच्या गळाला...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

काळे कोरकने यांना भेटला. त्यांनी रिक्षा विकायची नाही. आता रिक्षा परत करा, घेतलेले पैसे परत करतो. असे म्हणून त्यांनी स्टेट बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या बाजार सावंगी शाखेचे प्रत्येकी 28 हजारांचे दोन व एक नऊ हजारांचा धनादेश कोरकने यांना दिले. सुरवातीला नऊ हजारांचा धनादेश 16 मार्च 1998 ला कोरकने यांनी बॅंकेत वटविण्यासाठी टाकला; पण काळेच्या खात्यात रक्कम नसल्याने तो वटला नाही.

औरंगाबाद - धनादेश अनादर प्रकरणात बारा वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (ता.तीन) करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, प्रवीण बाळासाहेब काळे (वय 51, मूळ रा. ताजनापूर, ता. खुलताबाद) असे संशयिताचे नाव आहे. त्याने पहारेकऱ्याची पन्नास हजारांची फसवणूक केली होती. 

एमआयडीसी चिकलठाणा येथील एका कंपनीत शिवराम गंगाराम कोरकने (वय 35, रा. नारेगाव) पहारेकरी होते. कोरकने यांनी 12 जानेवारी 1998 ला प्रवीण काळे याची मिनीडोअर रिक्षा एक लाख सोळा हजारांत खरेदी केली होती. हा व्यवहार काळेच्या हडकोतील घरी झाला होता. त्यावेळी पन्नास हजार रुपये रोख व उर्वरित 56 हजार फायनान्स कंपनीचे कर्ज काढून देण्यात येईल व त्याचे हप्ते कोरकने फेडतील असे ठरले होते.

त्यानंतर काळे कोरकने यांना भेटला. त्यांनी रिक्षा विकायची नाही. आता रिक्षा परत करा, घेतलेले पैसे परत करतो. असे म्हणून त्यांनी स्टेट बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या बाजार सावंगी शाखेचे प्रत्येकी 28 हजारांचे दोन व एक नऊ हजारांचा धनादेश कोरकने यांना दिले. सुरवातीला नऊ हजारांचा धनादेश 16 मार्च 1998 ला कोरकने यांनी बॅंकेत वटविण्यासाठी टाकला; पण काळेच्या खात्यात रक्कम नसल्याने तो वटला नाही.

हेही वाचा -नाराजीनाट्यानंतर पंकजा मुंडे बोलल्या, केला महत्वाचा खुलासा 

खात्यात पैसे नसल्याने उर्वरित दोन चेक कोरकने यांनी बॅंकेत वटविण्यासाठी टाकले नाहीत. त्यांनी थेट काळेची भेट घेऊन त्याच्याकडे पैशांची मागणी केली; पण त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याने कोरकने यांनी सिडको ठाण्यात तक्रार दिली. यानंतर काळे पसार झाला होता. 

हेही वाचा - मोदींची ऑफर नाकारली! 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Check Bounce Suspected arrested