नाराजीनाट्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदा बोलल्या, केला महत्त्वाचा खुलासा!

टीम ई-सकाळ
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

काही माध्यमांनी त्याचा पोस्टचा विपर्यास केला आणि मी नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यामुळं मी व्यतिथ झाले. : पंकजा मुंडे

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण, त्यानंतर आज पहिल्यांदा पंकजा मुंडे मीडियाला सामोऱ्या गेल्या. त्यात त्यांनी मी भाजपची निष्ठावान कार्यकर्ती आहे, असं सांगून माझ्या पोस्टचा विपर्यास केल्याचं म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतरही त्या खरचं नाराज आहे की नाहीत, याविषयी संभ्रम कायम आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई सकाळचे एप

'ही तर अफवा'
पंकजा मुंडे यांनी आज रॉयलस्टोन या निवासस्थानाबाहेर मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मीडियात आलेल्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली. पंकजा मुंडे म्हणाल्या, 'मी भाजपची निष्ठावान कार्यकर्ती आहे. माझ्या वडिलांची 12 डिसेंबरला जयंती असते. दर वर्षी मी त्यानिमित्तानं कार्यकर्त्यांशी संवाद साधते. दर वर्षी प्रमाणं मी त्यांना गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहन केलं होतं. पण, काही माध्यमांनी त्याचा पोस्टचा विपर्यास केला आणि मी नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यामुळं मी व्यतिथ झाले. हे कोणी केलं? कशासाठी केलं? हे माहिती नाही कदाचित मला कोणतंही पद मिळू नये म्हणून, माझ्या विरोधात असं काही तरी उठवलं जात असावं. मुळात बंडखोरी माझ्या रक्तातच नाही. माझ्या वडिलांनी भाजपसाठी खूप कष्ट घेतले. मीदेखील मोठ्या संघर्षानंतर इथवर आली आहे. भाजप युवा मोर्चामध्ये मी काम केलंय. त्यामुळं या पक्षाशी माझं वेगळं नातं आहे. मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहे ही निव्वळ अफवा आहे.'

आणखी वाचा - भाजपचा नाराज गट एकवटतोय? 

आणखी वाचा - कर्जमाफीच्या अफवेवर रितेश देशमुखचा खुलासा

विधानसभा निवडणुकीत पराभव
विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. या पराभवाला भाजपमधीलच काही नेते जबाबदार असल्याचा आरोप, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलाय. खडसे यांच्या आरोपामुळे पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या वृत्ताला बळ मिळालं. तसचं आज भाजपच्या नेत्यांनी पंकजा यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यात बबनराव लोणीकर यांनी भेट घेतल्यानंतर पकंजा यांनी विधान परिषदेत घ्यावे, अशी मागणी केली. त्यामुळं पंकजा मुंडे पक्षावर दबाव टाकत असल्याची चर्चा सुरू झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pankaja munde statement after rumors about quitting bjp