Dharashiv News : भुजबळ सांगतील त्यांनाच मतदान टाकू अन्यथा मतदानावर बहिष्कार; समता परिषदेची भूमिका

राज्यातील ओबीसी नेते राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीची उमेदवारी डावलल्यामुळे येथील ओबीसी समाज बांधव संभ्रमित झाले आहेत. या विषयी येथील समता परिषदेसह ओबीसी बांधवांची एक तातडीची बैठक शनिवारी (ता. २०) झाली.
chhagan bhujbal obc leader lok sabha mahayuti vote politics
chhagan bhujbal obc leader lok sabha mahayuti vote politicsSakal

धाराशिव : राज्यातील ओबीसी नेते राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीची उमेदवारी डावलल्यामुळे येथील ओबीसी समाज बांधव संभ्रमित झाले आहेत. या विषयी येथील समता परिषदेसह ओबीसी बांधवांची एक तातडीची बैठक शनिवारी (ता. २०) झाली.

भुजबळ ज्यांना सांगतील त्याच उमेदवारास या निवडणुकीत मतदान करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आता भुजबळ कोणत्या उमेदवारासाठी मतदान करण्याचा कानमंत्र देतात याकडे ओबीसी बांधवांचे लक्ष लागले आहे.

महायुतीकडून भाजपाचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी नाशिक लोकसभेची जागा आमचे नेते राज्याचे अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना द्यावी असे आदेश दिले होते. दिल्लीतील वरिष्ठांचे आदेश असताना राज्यातील महायुतीच्या नेत्यांकडून तीन आठवड्यातून अधिक काळ कुठलाही निर्णय होत नसल्याने याचा फायदा समोरच्या विरोधी उमेदवाराला होत होता.

त्यामुळे पक्ष हितासाठी भुजबळांनी निवडणूकीतून मागार घेतली. भुजबळ यांच्याबाबत जाणीवपूर्वक उमेदवारी देण्यास विलंब केला. त्यामुळे राज्यभरातील ओबीसीमध्ये संभ्रम आहे. त्यामुळेच भुजबळ सांगतील त्यालाच लोकसभा निवडणुकीत मतदान टाकू अन्यथा बहिष्कार टाकू असा निर्णय येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कार्यकर्ता व ओबीसी समाजाचे काही प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते व काही ओबीसी समाजाचे प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक येथे शनिवारी (ता. २०) झाली. या बैठकीत नाशिक येथील लोकसभेची उमेदवारी छगन भुजबळ यांना देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी ठरवले होते. मात्र महायुतीच्या नेत्यांनी ती जागा देण्याबाबत जाणीवपूर्वक विलंब केला.

त्यामुळे राज्यात व मराठवाड्यात ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे भुजबळ साहेब सांगतील त्यालाच आपण मतदान टाकू अन्यथा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असे सवार्नुमते यावेळी ठरविण्यात आले आहे.

यावेळी धाराशिवचे जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे, परंडा तालुकाध्यक्ष दीपक भोसले, कळंब तालुकाध्यक्ष प्रशांत वेदपाठक, तुळजापूर तालुकाध्यक्ष प्रदीप राऊत, लोहारा -उमरगा तालुकाध्यक्ष राम जाधव, भूम तालुकाध्यक्ष सचिन माळी, शहराध्यक्ष रवी गोरे माळी, परंडा शहराध्यक्ष ज्योतीराम अलबत्ते, जिल्हा संघटक अशिष माने यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com