Sandipan Bhumre : भुमरेंची भिस्त भाजपच्या यंत्रणेवर! ;शहरातील तीनही मतदारसंघांत दिसले चित्र

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघात काही अपवाद वगळता, महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांची भिस्त भारतीय जनता पक्षाच्या यंत्रणेवरच अवलंबून असल्याचे चित्र दिसून आले.
Sandipan Bhumre
Sandipan Bhumre sakal

छ्त्रपती संभाजीनगर : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघात काही अपवाद वगळता, महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांची भिस्त भारतीय जनता पक्षाच्या यंत्रणेवरच अवलंबून असल्याचे चित्र दिसून आले. तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचे सोमवारी (ता. १३) पाहायला मिळाले.

हा मतदारसंघ कुणाला सुटणार इथपासून शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जोरदार स्पर्धा लागली होती. मतदारसंघ शिंदे गटाला आणि उमेदवारी पालकमंत्री भुमरे यांना मिळाली. यानंतर भाजपच्या गोटात नाराजीचे वातावरण होते. प्रारंभी काही काळ भाजप प्रचारापासून अलिप्त असल्याचे दिसून आले.

परंतु, नंतर भाजप सक्रिय झाली. सोमवारी मतदानाच्या दिवशीदेखील पूर्वमधील भवानीनगर, संजयनगर परिसर वगळता इतर वसाहतींमध्ये भाजपचेच कार्यकर्ते पदाधिकारी बूथवर अधिक असल्याचे दिसून आले. मध्य मतदारसंघातदेखील बहुतांश ठिकाणी भाजपचीच यंत्रणा काम करत असल्याचे दिसले. पश्चिम मतदारसंघातील शिवाजीनगर, सातारा परिसर, नाईकनगरसह इतर काही भाग वगळता भाजपचेच कार्यकर्ते किल्ला लढवत असल्याचे दिसून आले.

मंत्री कराड, सावे, बोराळकरांचे दौरे

शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांतील बूथवर शिंदे गटातील आमदार, जिल्हाप्रमुखांसह भाजपचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर हे सोबत तर राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, मध्य मतदारसंघात प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांनी स्वतंत्रपणे भेट देत विविध बूथवर जाऊन आढावा घेत असल्याचे दिसून आले.

कार्यकर्त्यांसमवेत फोटो सेशन

मंत्री कराड, शहराध्यक्ष बोराळकर यांनी हडको, खाराकुंवा, गुलमंडी, जयभवानीनगर, गारखेडा, हर्सूल आदी परिसरात भेटी दिल्या. शेवटपर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक करीत त्यांच्यासमवेत फोटोसेशनदेखील केल्याचे दिसले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com