

छत्रपती संभाजीनगर: मालकाच्या मुलीचा डीपी असलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरून आलेल्या मेसेजच्या आधारे ३ कोटी ७० लाख रुपये दोन बँक खात्यांत वळते करण्यात आले. हा मेसेज मालकाकडूनच आल्याचे समजून, कोणतीही शहानिशा न करता अकाउंटंटने पैसे वळते केले. अकाउंटंटच्या या निष्काळजीपणामुळेच सायबर भामट्यांनी कंपनीला गंडा घातला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पैसे दोन खात्यांत जमा होताच अवघ्या अडीच तासांत ते २८ इतर खात्यांमध्ये फिरवत करून सायबर भामट्यांनी चलाखी दाखवली.