

ST bus wheel detaches near speedbreaker and hits axle; 38 passengers safe.
Sakal
कायगाव : छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर जुने कायगाव (ता. गंगापूर) येथे शनिवारी (ता. ३) दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास धावत्या एसटी महामंडळाच्या बसचा अॅक्सलमधून उजव्या बाजूचा टायर निखळून पडला. गाडी सुमारे वीस फूट अंतरावर फरफटत गेली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून ३८ प्रवाशांचे प्राण वाचवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.