Chh. Sambhajinagar News
sakal
छत्रपती संभाजीनगर,: साडेपाच वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळानंतर महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन झाली, तर ३३ नगरसेवक निवडून आलेला ‘एमआयएम’ हा विरोधी पक्ष बनला. सत्तास्थापनेनंतर भाजप-शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे; पण शुक्रवारी (ता. १८) झालेल्या सर्वसाधारण सभेत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी गौरी-गणपती सणानिमित्त सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची मागणी केली आणि महापौर समीर राजूरकर यांनी सभा तहकूब केली.