

Property Dispute Turns Fatal Within an Hour
esakal
मालमत्तेच्या वादातून रक्ताचे नाते किती क्रूर होऊ शकते, याचे विदारक उदाहरण छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आले आहे. न्यायालयाने घराचा ताब्याचा निकाल वृद्ध आई-वडिलांच्या बाजूने दिल्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत पोटच्या मुलाने ८४ वर्षीय वडिलांना धारदार शस्त्राने वार करून ठार मारले. ही घटना रेल्वे स्टेशन परिसरातील अबरार कॉलनीत घडली.