चित्तेपिंपळगाव - दिंदयाळनगर येथील छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाने २०२५-२६ च्या गाळप हंगामात आव्हानात्मक परिस्थितीतही उल्लेखनीय कामगिरी करत ३ कोटी ४८ लाख २८ हजार ५८५ रुपयांचा निव्वळ नफा मिळविला..ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिमेट्रिक टन ३ हजार रुपये भाव देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला असून, आतापर्यंत २,९०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. उर्वरित १०० रुपयांचा अंतिम हप्ता लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी दिली..छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी कारखाना प्रांगणात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बागडे यांनी कारखान्याच्या आर्थिक कामगिरीची माहिती दिली. साखर उद्योगासमोर विविध आव्हाने असतानाही कारखान्याने नफ्याची कामगिरी नोंदविल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर भागधारकांना ६ टक्के लाभांश देण्याची घोषणाही करण्यात आली..सभेत नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, रामचंद्र भोगले आणि प्रल्हाद पन्हाळे यांच्या संचालकपदावरील नियुक्तीस सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी संचालक देवजीभाई पटेल, विवेक देशपांडे, बळीराम उकर्डे, प्रकाश काकडे आणि राधाकिसन पठाडे उपस्थित होते. बी. बी. ठोंबरे, विवेक देशपांडे आणि प्रल्हाद पन्हाळे यांनी मार्गदर्शन केले.कारखान्याचे व्यवस्थापक दिगंबर बडदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्य लेखाधिकारी शिवाजी टकले यांनी ताळेबंद अहवाल सादर केला. उपाध्यक्ष दामोदर नवपुते यांनी आभार मानले. सभेस सजनराव मते, रामराव शेळके, भागचंद ठोंबरे, संतोष गावंडे, कचरू जाधव, शहादेव बागडे, रुद्र झिंजुर्डे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते..१०.५६ टक्के उताऱ्यासह ३.३५ लाख क्विंटल साखर२०२५-२६ च्या हंगामात कारखान्याने ३ लाख ३० हजार ८०४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून १०.५६ टक्के साखर उताऱ्यासह ३ लाख ३५ हजार ९८० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. आगामी २०२६-२७ हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उसाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे गाळपात घट होण्याची शक्यता असली तरी कारखान्याने आगामी हंगामासाठी ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. शेतकऱ्यांनी आगामी हंगामात कारखान्यालाच ऊस पुरवठा करावा, असे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.