मुख्याधिकारी रामदास पाटील यांची अमेरिका दौऱ्यासाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

हिंगोली : येथील पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची राज्य शासनाच्या शिफारशीवरून अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तेथे कॅलीफोर्निया विद्यापीठात परवडणाऱ्या दरात घरकुल बांधकाम याबाबत प्रशिक्षणही होणार आहे. राज्यातील एकेवीस अधिकाऱ्यांमधे त्यांचा समावेश आहे. 

राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेमधे लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल दिले जाणार  आहे. सन 2022 मधे सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. त्यामधे परवडणाऱ्या दरात घरकुल बांधकाम कसे करावे या विषयावर अमेरिकेतील कॅलीफोर्निया विद्यापीठात प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिवाय तेथे अत्याधुनिक पध्दतीने बांधण्यात आलेल्या घरांची पाहणी देखील केली जाणार आहे. शनिवारपासून 19 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत हा अभ्यास दौरा असणार आहे. 
राज्यातील मुख्याधिकाऱ्यांतून केवळ दोन अधिकाऱ्यांचीच निवड झाली असून त्यात पाटील यांच्यासह पंढरपूरचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचा समावेश आहे. 

पाटील यांनी हिंगोलीत स्वच्छ सर्वेक्षण अभियानामधे भरीव कामगिरी केली आहे. या शिवाय घनकचरा व्यवस्थापनामधे त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन औरंगाबाद येथील कचराप्रश्न सोडविण्यासाठी श्री. पाटील यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची या दौऱ्यासाठी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, राम कदम, नगरसेवक गणेश बांगर, नगरसेवक अमेरअली, नाना नायक यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: chief executive Ramdas Patil selected for america visit