मुख्यमंत्री फडणवीस व अभिनेते अक्षय कुमार आज परळीत

Chief Minister Fadnavis and actor Akshay Kumar is in Parali today
Chief Minister Fadnavis and actor Akshay Kumar is in Parali today

बीड : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आज शुक्रवारी (ता. 22) होत असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट अभिनेता अक्षयकुमार परळीत उपस्थित राहणार आहेत.

दुष्काळग्रस्त भागातील हिंदू, बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन समाजातील 79 जोडप्यांचा विवाह सायंकाळी सहा वाजता याठिकाणी होणार आहे. 
दुष्काळात सापडलेल्या पालकांना मदतीच्या हेतूने पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदर डाॅ. प्रितम मुंडे यांच्या पुढाकाराने हा सोहळा होत आहे. या सोहळ्यात वधू वरांचे कपडे, सोन्याचे मनी मंगळसुत्र, संसारोपयोगी साहित्य देवून पंकजा मुंडे हया कन्यादान करणार आहेत. देवेंद्र फडणवीस, अक्षयकुमार यांच्यासह पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासह भाजप आमदार उपस्थित असतील. 

परळी येथील तोतला मैदानावर विवाह सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. मागासवर्गीय समाजातील वर वधूंना संसारोपयोगी साहित्यासाठी 20 हजार रूपयांचे आर्थिक सहाय्य देखील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार असून दोन्ही बाजूच्या वऱ्हाडी मंडळींच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com