esakal | पाया ढासळत असेल तर आत्मपरीक्षण करण्याची गरज, मुख्यमंत्री ठाकरेंचा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन भाजपला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

शिखरावर चढले तरी पाया ढासळत असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. याचं आत्मपरीक्षण भाजपाने करण्याची गरज आहे, असा सल्ला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

पाया ढासळत असेल तर आत्मपरीक्षण करण्याची गरज, मुख्यमंत्री ठाकरेंचा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन भाजपला टोला

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : एकनाथ खडसे यांचे महाविकास आघाडीत स्वागतच आहे. परंतु एकेकाळी माझे मित्र असलेल्या भारतीय जनता पक्षाला आपल्या पक्षाचा पाया का खचला जात आहे. शिखरावर चढले तरी पाया ढासळत असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. याचं आत्मपरीक्षण भाजपाने करण्याची गरज आहे, असा सल्ला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर बुधवारी (ता.२१) तुळजापूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

धीर सोडू नका, खचून जाऊ नका या शब्दात मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा


श्री.ठाकरे म्हणाले, की एकनाथ खडसे, स्व. गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन यांनी भाजपची पाळेमुळे रोवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांनी अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला आणि शेवटी एकनाथ खडसे यांच्यासारखा नेता भाजप सोडून जात असेल तर याचे मुख्य कारण काय आहे. याचे आत्मपरीक्षण भाजपने करावे. एकनाथ खडसे हे महाविकास आघाडीत येणार आहेत. त्यांचे स्वागतच आहे. शेतकरी संकटात आहे. प्रत्येक मिनिटाला आम्ही माहिती घेत आहोत. जीवितहानी होऊ नये म्हणून मोठे प्रयत्न केले. वीज पडून अनेक शेतकरी दगावले. पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच आम्ही तात्पुरत्या स्वरुपाची मदतही केली आहे. तेलंगणा राज्याने मदत घोषित केली. आपणास मदत करायला उशीर होत असल्याचे विचारले असता, श्री.ठाकरे म्हणाले, ठोस मदत करु. राज्य सरकार मदत करण्यासाठी बांधिल आहे. हक्काचे पैसे असणे आवश्‍यक आहे. पूर्व विदर्भात आधी मदत केली. कोविड हॉस्पिटलसाठी मदत मोठ्या प्रमाणावर केली. जीएसटीचे पैसे केंद्राकडून येणे तुंबले आहे. शिक्षणाचा मुद्दा कोविडमुळे अडचणीचा ठरला आहे. युरोपमध्ये पुन्हा कोरोनाची मोठी लाट येत आहे. तिथे तरुणही बाधित होत आहे. आपल्याला कोरोना रोखून नागरिकांचे जीव वाचवायचे आहे. मी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. मदतही ठोसपणाने करणार आहे, याचाश्री.ठाकरे यांनी पुनरुच्चार केला.संपादन - गणेश पिटेकर

loading image