मुख्यमंत्री ‘ठाकरीबाणा’ दाखवणार का ? : संभाजी पाटील निलंगेकर

मलिकांना मंत्रिमंडळात ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे.
Sambhaji Patil Nilangekar, Ramesh Karad, Abhimanyu Pawar And Gurunath Mage
Sambhaji Patil Nilangekar, Ramesh Karad, Abhimanyu Pawar And Gurunath Mageesakal

लातूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ठाकरीबाणा दाखवणार का?, असा सवाल माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी गुरुवारी (ता.२४) येथे पत्रकार परिषदेत केला. मलिकांना मंत्रिमंडळात ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असेही ते म्हणाले. श्री. पाटील म्हणाले, नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्याचे पुरावे ‘ईडी’कडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या दाऊद इब्राहीमने १९९२ मध्ये मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून शेकडो निरपराध नागरिकांचे बळी घेत देशाविरुद्धचा सर्वांत घातक दहशतवादी कट आखला, त्याच दाऊदशी नवाब मलिक यांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. असे असतानाही मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास विरोध करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लांगूलचनाच्या राजकारणाची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल. (Chief Minister Uddhav Thackeray Show His Thackeray Style For Nawab Malik, Says Sambhaji Nilangekar)

Sambhaji Patil Nilangekar, Ramesh Karad, Abhimanyu Pawar And Gurunath Mage
मॅगीवरच काढावा लागतोय दिवस, युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची व्यथा

मलिक यांना मंत्रिपदावर ठेवण्याच्या दबावापुढे झुकून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण कणाहीन राजकारणी असल्याचे सिद्ध केले आहे, अशी टीकाही श्री. निलंगेकर यांनी यावेळी केली. नैतिकता म्हणून तरी मलिक यांचा राजीनामा घ्यावा, असे आमदार कराड म्हणाले. मलिकांना वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने एकजूट दाखवली जात आहे, तशीच एकजूट मराठा तसेच ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळी महाविकास आघाडीने दाखवली असती तर जनतेला बरे वाटले असते अशी कोपरखळी आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी बोलताना मारली. यावेळी गुरुनाथ मगे, मनीष बंडेवार, दिग्विजय काथवटे आदी उपस्थित होते. (Latur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com